शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी बाबूंचा शिस्तीला विरोध

By admin | Updated: January 30, 2015 04:38 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी लावू पाहात असलेल्या शिस्तीचा जाच होऊ लागलेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या सवयी बदलण्याऐवजी संघर्षाचा पवित्रा घेतला आहे.

नितीन अग्रवाल, नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी लावू पाहात असलेल्या शिस्तीचा जाच होऊ लागलेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या सवयी बदलण्याऐवजी संघर्षाचा पवित्रा घेतला आहे. कार्यालयीन कामात मोदींना काटेकोर वक्तशीरपणा अपेक्षित असला तरी त्यासाठी सरकारी बाबू काहीकेल्या राजी नाहीत. त्यातून आता बाबू आणि सरकार यांच्यात शिस्त पालनावरून संघर्षाच्या ठिणग्या पडण्यास सुरुवात झाली आहे. परराष्ट्र, पेट्रोलियम, मानव संसाधन, क्रीडा, आरोग्य, कृषी आणि कंपनी कामकाज मंत्रालयातील बाबू मोदींच्या मिशन बीएएसचा सर्वाधिक विरोध करीत आहेत.सरकारी बाबूंच्या कार्यालयात येणे आणि जाण्याच्या वेळेचा रेकॉर्ड ठेवणाऱ्या बायोमेट्रिक यंत्रांपैकी ५०हून जास्त यंत्रांची तोडफोड करण्यात आली आहे किंवा ते चोरीला तरी गेले आहेत. बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीम (बीएएस) लावणाऱ्या केंद्रीय दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने याबाबत संबंधित विभागांकडे रीतसर तक्रारही केलेली आहे. सरकारने याची गंभीर दखल घेतली असून, विभागांच्या जबाबदार अधिकाऱ्यांना संयुक्त सचिव स्तरावरून कठोर भाषेतील पत्रे रवाना झाली आहेत. मोडतोड झालेल्या वा चोरी गेलेल्या बायोमेट्रिक यंत्रांच्या जागी आता नवे यंत्र बसविण्याचे निर्देशही या पत्रात देण्यात आले आहेत. ही नवी बायोमेट्रिक यंत्रे लावण्याचा खर्च संबंधित विभागांनीच करावयाचा आहे. वापरात असलेल्या बीएएस यंत्रांपैकी ३६ यंत्रांचे चार्जर फोडण्यात आले आहेत. १३ यंत्रांना जोडण्यात आलेले टॅबलेट तोडण्यात आल्याचे तर २ यंत्रांचे फिंगर प्रिंट स्कॅनर फोडण्यात आल्याचे पत्रात नमूद केलेले आहे.