शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 14:44 IST

PM Modi Dhyan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारीत केलेल्या ४५ तासांच्या ध्यानधारणेवरुन विरोधकांनी त्यांना लक्ष्य केलं आहे.

PM Modi Dhyan Yatra: सातव्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर कन्याकुमारी येथील विवेकानंद दगडी स्मारकाच्या ध्यानमंडपम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ४५ तासांचे ध्यान केलं. १८९२ मध्ये स्वामी विवेकानंदांनी जिथे ध्यान केले त्याच ठिकाणी पंतप्रधान मोदी हे ध्यान करत होते. प्रसिद्ध विवेकानंद दगडी स्मारकाच्या 'ध्यान मंडपम' येथे भगव्या रंगाच्या पोशाखात ध्यान करताना पंतप्रधान मोदींचे फोटोही प्रसिद्ध करण्यात आलेत. यावरुनच आता विरोधकांनी पंतप्रधान मोदींना घेरलं आहे. कॅमेरे लावून कोण ध्यानधारणा करतं? असा सवाल ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. तर हे जगावेगळं ध्यान असल्याची टीका शरद पवार गटाने केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या शेवटच्या टप्प्याच्या आधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूच्या कन्याकुमारीमध्ये ध्यानात मग्न होते. गुरुवारी  संध्याकाळी ६.४५ वाजता पंतप्रधान मोदी ध्यानाच्या मुद्रेत बसले. या काळात पंतप्रधान मोदी कोणाशीही बोलले नाहीत. त्यानंतर शनिवारी दीड वाजण्याच्या सुमारास पंतप्रधानांनी त्यांचे ध्यान संपवले. यावेळी पीएम मोदींनी भगवे कपडे परिधान केले होते आणि त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. हातात जप माला घेऊन त्यांनी मंडपाची प्रदक्षिणाही केली.

मात्र आता पंतप्रधान मोदींच्या ध्यान धारणेवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी. ते आता कुठेतरी दूर गेल्याचे ऐकले आहे. निकाल येण्यापूर्वीच तपश्चर्यासाठी निघून गेले. त्यांच्या तपश्चर्येत काहीतरी उणीव होती असे म्हणता येईल, अशी टीका केली होती. दुसरीकडे राज्यातही मोदींवर निशाणा साधला आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चारही बाजूंनी २७ कॅमेरे लागले आहेत. ध्यान सुरु असताना जो माणूस मग्न असतो तो कॅमेऱ्याकडे पाहत नाही. मात्र पंतप्रधान मोदी चारही बाजूंनी २७ कॅमेरे लावून ध्यानाला बसले आहेत. हा लोकसाधनेचा अपमान आहे. पूर्वीच्या लोकांनी ध्यानधारणा करताना किती सिक्युरिटी वापरली होती?  आता तीन हजार सुरक्षा रक्षक हाताशी पकडून हे ध्यान करत आहेत”, अशी टीका संजय राऊत यांनी केली. तर दुसरीकडे शरद पवार गटाचे प्रवक्ते प्रशांत जगताप यांनी, "४६ सेकंदात २० अँगल. जगावेगळं ध्यान आहे हे!", म्हणत खोचक टोला लगावला आहे.

दरम्यान, ध्यानावरून सुरू असलेल्या वादात भाजपने विरोधकांवर जोरदार प्रहार केला. मोदी ध्यानात मग्न आहेत तर विरोधक का चिंतेत आहेत, असा सवाल भाजपने केला आहे. दुसरीकडे, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासंदर्भात सुरक्षा वाढवण्यात आली होती. सुमारे दोन हजार पोलीस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. यासोबतच भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदलाकडूनही कडक नजर ठेवण्यात आली होती.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीSanjay Rautसंजय राऊतcongressकाँग्रेस