शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी NDA समोर विरोधकांची PDA; भाजपविरोधात विरोधी आघाडीचे नाव ठरले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 15:40 IST

Opposition Alliance Name: लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या आघाडीचे नाव ठरल्याची माहिती आहे.

Opposition Alliance Name: 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 23 जून रोजी बिहारच्या पाटण्यात विरोधकांची बैठक झाली. या बैठकीत भाजप सरकारचा पराभव करण्यावर चर्चा झाली. तसेच, सर्व विरोधक एकत्रितपणे लढणार असल्याचे सांगण्यात आले. पुढच्या महिन्यात दुसरी बैठक होणार आहे. दरम्यान, विरोधकांच्या या ऐक्याचे नाव समोर आले आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, भाजपच्या नेतृत्वातील NDA सरकारचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी त्यांच्या आघाडीला PDA नाव दिले आहे. यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नसला तरी अंतर्गत चर्चा सुरू आहे. सीपीआयने हे नाव सूचवले असून, कॉंग्रेसने यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. PDA चे हिंदी भाषांतर(पॅट्रिओटिक डेमोक्रेटिक अलायन्स) गुंतागुंतीचे असल्याचे मत काँग्रेस आहे. विरोधी पक्षांची पुढील बैठक 12 ते 14 जुलै दरम्यान शिमल्यात होणार आहे. त्या बैठकीत विरोधी आघाडीचे नाव ठरू शकते.

पाटण्यात विरोधकांची बैठक झालीलोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांच्या ऐक्यासाठी शुक्रवारी (23 जून) पाटणा येथे बैठक झाली. या बैठकीत काँग्रेससह अनेक पक्ष सहभागी झाले होते.  2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला कडवे आव्हान देण्यासाठी एक मजबूत आघाडी तयार करण्याच्या रणनीतीवर विरोधी पक्षांची चर्चा झाली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. विरोधकांच्या आगामी बैठकांमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम आणि विरोधकांचे नेतृत्व कोण करेल, यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीNitish Kumarनितीश कुमारMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे