संधीसाधुंचा सुकाळ..... जोड....

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:32+5:302015-02-14T23:51:32+5:30

कालपरवा जे नगरसेवक भाजपमध्ये गेले, त्यांचे चरित्र तपासण्याचे कष्ट घेतले तर त्यांनी असाच वेळोवेळी कुठे ना कुठे, कसा ना कसा घरोबा केलेला दिसून येतो. कधी शिवसेनेशी तर कधी काँग्रेसशी...आणि आता भाजपशी! काँग्रेसही आज मरगळलेल्या अवस्थेत आहे. तिकडून इकडे येत असलेला छोटा-मोठा लोंढा रोखायचा कुणी प्रयत्न करताना दिसत नाही. आधीच तर एमआयएमची टांगती तलवार डोक्यावर आहेच. उरले- सुरले भाजपवासी होत असतील तर मनपाच्या आगामी निवडणुकीत काँग्रेसचं काय होईल, हे सांगायला कोणा ज्योतिष्याची मुळीच गरज नाही. काँग्रेस मरगळ झटकून मनपा निवडणूक लढवणार आहे की नाही, हे समजायलाच मार्ग नाही. नुसतीच कोअर कमिटीची बैठक...पुढे काय? कसलीच रणनीती नाही. विरोधी पक्ष म्हणून भूमिका नाही.

Opportunity opportunity | संधीसाधुंचा सुकाळ..... जोड....

संधीसाधुंचा सुकाळ..... जोड....

लपरवा जे नगरसेवक भाजपमध्ये गेले, त्यांचे चरित्र तपासण्याचे कष्ट घेतले तर त्यांनी असाच वेळोवेळी कुठे ना कुठे, कसा ना कसा घरोबा केलेला दिसून येतो. कधी शिवसेनेशी तर कधी काँग्रेसशी...आणि आता भाजपशी! काँग्रेसही आज मरगळलेल्या अवस्थेत आहे. तिकडून इकडे येत असलेला छोटा-मोठा लोंढा रोखायचा कुणी प्रयत्न करताना दिसत नाही. आधीच तर एमआयएमची टांगती तलवार डोक्यावर आहेच. उरले- सुरले भाजपवासी होत असतील तर मनपाच्या आगामी निवडणुकीत काँग्रेसचं काय होईल, हे सांगायला कोणा ज्योतिष्याची मुळीच गरज नाही. काँग्रेस मरगळ झटकून मनपा निवडणूक लढवणार आहे की नाही, हे समजायलाच मार्ग नाही. नुसतीच कोअर कमिटीची बैठक...पुढे काय? कसलीच रणनीती नाही. विरोधी पक्ष म्हणून भूमिका नाही.
साधनशुचितेचा डांगोरा पिटणारा भाजप आज मनपा जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार झालेला दिसतो. या पक्षाची सध्या तरी खरी स्पर्धा शिवसेनेशी आहे. शिवसेनेला छोटा भाऊ करण्याची जणू अहमहमिका सुरू आहे. एकदा का शिवसेना पक्ष छोटा भाऊ झाला की मग त्याला आपल्या म्हणण्यानुसार सहज वाकवता येईल. एमआयएमच्या भीतीपोटी झाली युती तर झाली, नाही तर स्वतंत्र लढायला मोकळे, अशीच काहीशी रणनीती भाजपची दिसते. त्यासाठीच प्रवेश सोहळे आयोजित करण्यात भाजपची रुची वाढलेली आहे. नजीकच्या काळात आणखी एक असाच सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचे व काही दलबदलूंना पक्षात प्रवेश देऊन सन्मान वाढविण्यात येणार आहे. त्याचीही तयारी सुरूझालेली आहे. म्हणूनच सध्या संधिसाधूंचा सुकाळ झाला असून, जुन्यांचा जीव घुसमटायला लागलेला असणार! परंतु बेरजेपेक्षा गुणाकाराने आलेख वाढतो यावर भाजपचा विश्वास असल्याने असे किती प्रवेश सोहळे होतील, हे सांगता येत नाही, एवढं मात्र खरं!
स. सो. खंडाळकर

Web Title: Opportunity opportunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.