महाभियोग प्रस्तावावर विरोधकांची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 05:05 AM2018-03-29T05:05:02+5:302018-03-29T05:05:02+5:30

सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांच्यावर राज्यसभेत महाभियोग चालविण्याकरिता काँग्रेसने पुढाकार घेतला असून त्या अर्जावर गुुलाम नबी आझाद, अहमद पटेल, आनंद शर्मा व कपिल सिब्बल यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

Opponent's Test on Impeachment Proposal | महाभियोग प्रस्तावावर विरोधकांची कसोटी

महाभियोग प्रस्तावावर विरोधकांची कसोटी

Next

हरिश गुप्ता  
नवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांच्यावर राज्यसभेत महाभियोग चालविण्याकरिता काँग्रेसने पुढाकार घेतला असून त्या अर्जावर गुुलाम नबी आझाद, अहमद पटेल, आनंद शर्मा व कपिल सिब्बल यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सरन्यायाधीशांवर महाभियोग का चालविला जावा यामागची कारणे विषद केलेल्या महाभियोग प्रस्तावाची एक प्रत गुलाम नबी आझाद यांच्या संसद भवनातील कार्यालयात बुधवारी ठेवण्यात आली होती.
महाभियोग चालविण्याच्या मुद्द्यावर काँग्रेसचे नेते बोलण्यास उत्सुक नाहीत. मात्र एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमतह्णला सांगितले की, न्यायालयीन स्वातंत्र्याचा संकोच झाल्याची सर्वच विरोधकांची भावना आहे. समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पक्ष, राजद, डावे पक्ष, तृणमूल काँग्रेस, बिजू जनता दल, तेलगु देसम पक्ष व अन्य काही पक्षांच्या नेत्यांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी करावी अशी काँग्रेसची इच्छा आहे. डावे पक्ष व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याआधीच स्वाक्षरी केली आहे. या प्रस्तावावर वीस जणांनी स्वाक्षºया केल्याची माहिती मंगळवारी राष्ट्रवादीचे खा. माजीद मेमन व डी. पी. त्रिपाठी यांनी दिली होती. बुधवारी स्वाक्षरी करणाºयांची संख्या ५० पर्यंत पोहोचली आहे. माजिद मेमन यांनी सांगितले की, सरन्यायाधीशांवर महाभियोग दाखल करण्यास पुढाकार घेण्यास काँग्रेस आधी तयार नव्हती.

Web Title: Opponent's Test on Impeachment Proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.