व्यापारी संकुलाच्या इमारतींवर बेघरांचे पुनर्वसन करण्यास विरोध
By Admin | Updated: January 31, 2017 02:06 IST2017-01-31T02:06:18+5:302017-01-31T02:06:18+5:30
* लालबावटा खोकीधारक संघटनेचे नगराध्यक्षांना निवेदन

व्यापारी संकुलाच्या इमारतींवर बेघरांचे पुनर्वसन करण्यास विरोध
* ालबावटा खोकीधारक संघटनेचे नगराध्यक्षांना निवेदनइचलकरंजी : शहरातील विकली मार्केट व पंचवटी चित्रमंदिराजवळील व्यापारी संकुल या दोन्ही इमारतींवर पहिला मजला बांधून त्याठिकाणी बेघरांचे पुनर्वसन करण्याचा नगरपालिकेच्या विशेष सभेत संमत करण्यात आलेल्या प्रस्तावाला विरोध असल्याचे निवेदन लालबावटा खोकीधारक समितीच्यावतीने सोमवारी नगराध्यक्षा ॲड. अलका स्वामी यांना देण्यात आले. भेटलेल्या शिष्टमंडळात दोन्ही इमारतींतील लाभार्थ्यांचा समावेश होता.नगरपालिकेच्या २५ जानेवारीला झालेल्या विशेष सभेमध्ये राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत शहरातील विकली मार्केट व पंचवटी चित्रमंदिराजवळील व्यापारी संकुल या इमारतींवर पहिला मजला बांधून त्याठिकाणी शहरातील भटक्या बेघरांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला होता. मात्र, याठिकाणी असलेल्या लाभार्थ्यांना या लोकांचा उपद्रव होऊन त्याचा परिणाम त्यांच्या व्यवसायावर होणार आहे. म्हणून लालबावटा खोकीधारक समितीचे अध्यक्ष सदा मलाबादे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ नगराध्यक्षांना भेटले. शिष्टमंडळामध्ये ईर्शाद बागवान, मुनीर बागवान, विनायक टेके, उत्तम माळी, महेश लोखंडे, विनोद कांबळे, निर्मल कांबळे, आदींचा समावेश होता.शिष्टमंडळाने नगराध्यक्षा ॲड. स्वामी यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी भटक्या बेघरांचे पुनर्वसन साईट नंबर १०२ येथे करावे, असेही या शिष्टमंडळाने सूचित केले. त्यावर बोलताना नगराध्यक्षांनी याबाबत योग्य ती उपाययोजना केली जाईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)