Exit Poll : हिमाचल प्रदेशमध्ये सत्ता परिवर्तन, भाजपचे कमळ फुलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 18:28 IST2017-12-14T18:02:31+5:302017-12-14T18:28:53+5:30

हिमाचल प्रदेशमध्ये सत्तेत असणाऱ्या काँग्रेसची धुळदाण होणार आहे.  आज तक, इंडिया टुडे समूह आणि अॅक्सिस माय इंडियाने केलेल्या सर्वेक्षणातून हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाणार असल्याचे समोर आलं आहे

Opinion Poll: Power change in Himachal Pradesh, BJP's lily will bloom | Exit Poll : हिमाचल प्रदेशमध्ये सत्ता परिवर्तन, भाजपचे कमळ फुलणार

Exit Poll : हिमाचल प्रदेशमध्ये सत्ता परिवर्तन, भाजपचे कमळ फुलणार

नवी दिल्ली - हिमाचल प्रदेशमध्ये सत्तेत असणाऱ्या काँग्रेसची धुळदाण होणार आहे. इंडिया टुडे समूह आणि अॅक्सिस माय इंडियाने केलेल्या सर्वेक्षणातून हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाणार असल्याचे समोर आलं आहे. हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण 68 जागा आहेत. सर्वेक्षणातून मिळालेल्या आकडेवारीनुसार भाजपा 47-55 जागा जिंकत एकहाती सत्ता स्थापन करु शकते. सत्तेत असलेल्या काँग्रेसला 13-20 जागांवर समाधान मानावं लागत आहे. 

मतदानापूर्वी दोन्ही पक्षानं  हिमाचलमध्ये आपलीच सत्ता येईल असा दावा केला होता.  1992 पासूनचा इतिहास पाहिला तर हिमाचलमध्ये दरवेळेस सत्ता परिवर्तन होत असल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान,ओपिनियन पोल मध्ये, इथं भाजप सत्ता स्थापन करेल असं दिसतं आहे. 2012 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं 36 जागा मिळवत सत्ता स्थापन मिळवली होती. भाजपनं 26 जागांवर विजय मिळवला होता. तर अपक्षांना 6 जागा मिळाल्या होत्या.

ओपिनियन पोलचा अंदाज कोणाला किती जागा मिळणार

  • सध्या सत्तेत असणारी काँग्रेस- 13-20
  • सध्या विरोधी पक्षात असणारी भाजप- 47-55
  • तर इतर- 0-3

कोणत्या पक्षाला किती टक्के मतं मिळतील?

  • काँग्रेस-  47.6 टक्के
  • भाजप –  44 टक्के
  • इतर – 8.3 टक्के 

Web Title: Opinion Poll: Power change in Himachal Pradesh, BJP's lily will bloom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.