माझ्या वक्तव्याचा विपर्यास - पित्रोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 04:26 IST2019-05-11T04:26:09+5:302019-05-11T04:26:38+5:30

मी शीख समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले नव्हते. माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. तरीही माझ्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो,

 Opinion about my statement - Pitroda | माझ्या वक्तव्याचा विपर्यास - पित्रोडा

माझ्या वक्तव्याचा विपर्यास - पित्रोडा

नवी दिल्ली - मी शीख समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले नव्हते. माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. तरीही माझ्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे सॅम पित्रोडा शुक्रवारी म्हणाले. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या दंगलींविषयी ‘जे झाले ते झाले’ असे ते म्हणाल्याचे प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली. काँग्रेसनेही ही आमची भूमिका नसल्याचे सांगितले. त्यानंतर पित्रोडा म्हणाले की, जे झाले, ते वाईट झाले, असे मला म्हणायचे होते. पण माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला.

Web Title:  Opinion about my statement - Pitroda