शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 04:04 IST

ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असल्याच्या लष्कराच्या विधानामुळे ही भीती कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू : शनिवारी रात्री ११ वाजल्यानंतर केंद्रशासित प्रदेशात शांतता परतली आणि रविवारी कोणत्याही नवीन गोळीबाराचे किंवा ड्रोन घुसखोरी न झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र, येथे युद्धाच्या भीतीचे वातावरण कायम आहे. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असल्याच्या लष्कराच्या विधानामुळे ही भीती कायम आहे.

उरीमधील कमलकोट येथील रहिवासी मुनीर हुसेन म्हणाले की, शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री नियंत्रण रेषेला लागून असलेल्या या गावात आणि त्यांच्या आसपासच्या भागात शांतता होती. पण, त्यांना अजूनही बंकरमधून बाहेर पडण्याचे धाडस करता आलेले नाही.निवृत्त लष्करी कर्मचारी हुसेन म्हणाले की, शेवटचे काही दिवस मोठ्या संकटासारखे होते.

१९९९ च्या (भारत-पाकिस्तान) युद्धादरम्यानही इतका गोळीबार पाहिला नव्हता. मला आशा आहे की शांतता नांदू लागेल. मात्र, युद्धबंदी लागू असली तरी, जम्मूमध्ये तणाव कायम आहे. संशयित दहशतवाद्यांनी नगरोटा परिसरातील लष्कराच्या १६ व्या कॉर्प्स मुख्यालयावर गोळीबार केला असून, यात एक सैनिक जखमी झाला आहे.

पाकच्या गोळीबारात २२ नागरिकांचा मृत्यू

भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांना गोळीबाराचा सर्वाधिक फटका बसला. यात किमान २२ नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार मुलांचाही समावेश आहे.

काश्मीरमध्ये आणखी हल्ले होणार? : काश्मीरमध्ये आणखी हल्ले होण्याची शक्यता असल्याच्या अफवांना उधाण आले. युद्धबंदीचा फायदा घेत सीमा ओलांडण्यात अनेक दहतशवादी यशस्वी झाल्याचेही समोर येत आहे.

नागरिक म्हणतात…

जम्मू शहरातील नागरिकांना रात्रभर नीट झोप लागली नाही. आता क्षेपणास्त्र किंवा ड्रोन हल्ले होणार नाहीत हे लहान मुलांना समजावून सांगताना पालकांना नाकीनऊ आले. १९६५ आणि १९७१ च्या युद्धांना तोंड देणाऱ्या जम्मूच्या लोकांनी कधीही बंकर उभारले नाहीत.  पुंछ येथील रहिवासी मुर्तजा अली यांनी सांगितले की, आता पूर्ण शांतता आहे. पण, पाकिस्तानवर विश्वास ठेवता येत नाही, म्हणूनच मला रात्रभर झोप लागली नाही.

रात्रभर संभ्रम; सकाळी जनजीवन सुरळीत

जयपूर : युद्धबंदी जाहीर झाल्यांनतर राजस्थानच्या सीमा भागात संभ्रम आणि अनिश्चिततेचे वातावरण होते. मात्र, रविवारी सकाळपासून सर्वत्र जनजीवन सुरळीत झाले. उत्तर-पश्चिम रेल्वेने सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. रविवारी रद्द झालेल्या १६ गाड्या पुन्हा सुरू केल्या. 

अनेक भागांत क्षेपणास्त्रासारखे अवशेष

राज्याच्या सीमेलगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये अनेक भागांत रविवारी पडलेले ड्रोन आणि क्षेपणास्त्राच्या आकाराचे अवशेष सापडले. मात्र, युद्धबंदी जाहीर झालेली असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण नव्हते. नंतर रविवारी दिवसभर हळूहळू जनजीवन पूर्वपदावर आले.

पंजाबमध्येही शांतता

शनिवारी रात्रीपासून पाकिस्तानलगत असलेल्या पंजाबच्या सीमेवरही शांतता आहे. संवेदनशील अमृतसर जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सर्व व्यवहार नियमितपणे चालू ठेवण्याच्या सूचना केल्या.

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकJammu Kashmirजम्मू-काश्मीर