शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी अतिवृष्टीमुळे अंदाजे ६० लाख हेक्टर नुकसान, पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
4
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
5
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
6
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
7
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
8
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
9
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
10
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
11
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
12
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
13
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
14
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
15
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
16
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
17
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
18
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...
19
IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
20
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?

९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 01:54 IST

हे घ्या पुरावे; मोस्ट वाँटेडसह १०० पेक्षा जास्त अतिरेकी यमसदनी, भारताचेही ५ जवान शहीद

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत भारताने ७ मे रोजी पाकिस्तान हद्दीत घुसून ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर दोन्ही देशांत निर्माण झालेला तणाव आणि यातून झालेले परस्परांवरील हल्ले-प्रतिहल्ल्यांची माहिती भारताच्या लष्करी मोहिमांचे महासंचालक लेफ्ट. जनरल राजीव घई यांच्यासह हवाई व नौदलाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. 

यानुसार, भारताने या कारवाईत मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांसह १००हून अधिक दहशतवादी यमसदनी पाठवले. ७ ते १० मेदरम्यान शत्रूच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे ३५ ते ४० सैनिक मारले गेल्याची माहिती या वेळी देण्यात आली. या संपूर्ण मोहिमेत हवाई दलाचे सर्व पायलट सुखरूप परतल्याचे एअर मार्शल ए. के. भारती यांनी सांगितले. तर, वेळप्रसंगी कराची बंदरावर जोरदार हल्ल्यासाठी नौदल सज्ज होते, असे व्हाईस ॲडमिरल ए. एन. प्रमोद यांनी सांगितले.

९ दहशतवादी अड्ड्यांना टार्गेट करत अचूक शस्त्रे वापरून उद्ध्वस्त केले

लष्करी मोहिमांचे महासंचालक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितले की, या संघर्षात ३५-४० पाकिस्तानी लष्करी जवान ठार करण्यात आले. या कारवाईत भारताचे उद्दिष्ट साध्य झाले आहे आणि यापुढे पाकिस्तानने कोणतेही दु:साहस केले तर त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल.

घई यांनी सांगितले की, या कारवाईत शहीद झालेल्या पाच भारतीय जवानांना आणि नागरिकांना श्रद्धांजली वाहत आहोत. आतापर्यंत आम्ही प्रचंड संयम बाळगला आहे. आम्ही आमच्या कृती केंद्रित आणि संतुलित केल्या आहेत. तथापि, आमच्या नागरिकांच्या सार्वभौमत्वाला, प्रादेशिक अखंडतेला आणि सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण झाल्यास निर्णायक ताकदीने सामना केला जाईल.

ते म्हणाले की, सात मे रोजी ऑपरेशन सिंदूर दरम्यान आयसी ८१४च्या अपहरणात व पुलवामा बॉम्बस्फोटात सामील असलेल्या युसूफ अजहर, अब्दुल मलिक रऊफ व मुदासिर अहमद यांसारख्या अतिरेक्यांसह १०० पेक्षा अधिक दहशतवादी यमसदनी पाठवण्यात आले. काळजीपूर्वक विचारविनिमय केल्यानंतर नऊ दहशतवादी अड्डे निश्चित करण्यात आले. त्यांना अचूक शस्त्रे वापरून उद्ध्वस्त करण्यात आले.

कराची बंदरावरील हल्ल्यासाठी नौदलाने पूर्ण तयारी केली होती

पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला करण्यासाठी भारतीय नौदल पूर्णपणे सज्ज होते. पाकिस्तानच्या कराची क्षेत्राला नौदलाने पूर्णपणे घेरले होते. भारतीय सैन्याने पूर्ण तयारीसह समुद्र आणि जमिनीवरील निवडक लक्ष्यांवर कधीही हल्ला करण्याची तयारी केल्याचे व्हाइस ॲडमिरल ए. एन. प्रमोद यांनी रविवारी स्पष्ट केले.

भारतीय नौदलाने केवळ तत्परताच दाखवली नाही तर भारतीय सागरी सीमांची सुरक्षा निश्चित करत आपल्या दलांना युद्धासाठी पूर्णपणे सज्ज ठेवल्याचे प्रमोद म्हणाले. ऑपरेशन सिंदूर या अंतर्गत अरबी समुद्रात धोरणात्मक स्थिती मजबूत करण्यात आली. 

सागरी व जमिनीवरील हल्ल्यासाठी नौदल पूर्ण तयारीने समुद्रात तैनात केले होते. त्यामुळे कराची बंदरासह कोणत्याही महत्त्वाच्या लक्ष्यावर हल्ला करण्यासाठी भारतीय नौदल पूर्णपणे सज्ज होते. भारताकडे शत्रूच्या लक्ष्यांविरुद्ध अचूक आणि उच्च प्रभावशाली अभियान राबवण्याची पूर्ण क्षमता असल्याचे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट होत असल्याचे प्रमोद म्हणाले.

शत्रू टप्प्याबाहेर नाही हे दाखवून दिले, आमचे सर्व पायलट सुखरूप; एअर मार्शल ए. के. भारती

भारतीय हवाई दलाचे एअर मार्शल ए. के. भारती यांनी सांगितले, ‘७ मे रोजी रात्री लाहोर आणि गुजरानवालातील रडार यंत्रणेला लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानी लष्करी ठाणी भारतीय लष्कराच्या टप्प्याबाहेर नाहीत हे आम्हाला दाखवून द्यावयाचे होते. ८ व ९ मे रोजी पाकिस्ताननेही ड्रोन आणि विमानांनी भारतीय सीमेवर हल्ला केला होता; परंतु भारतीय लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचे त्यांचे बहुतांश प्रयत्न फोल ठरले.’ या सर्व कारवाईत आमचे सर्व पायलट सुखरूप परतले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली़.

शत्रूने लक्ष्य निश्चित करून रात्री उशिरापर्यंत हल्ले केले; परंतु भारतीय लष्कराच्या किंवा नागरी पायाभूत व्यवस्थेला कोणताही अपाय झाला नाही. दुसरीकडे लाहोरजवळून त्यांनी ड्रोन हल्ले सुरू केले होते आणि लाहोर हवाई क्षेत्रातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणेही सुरू ठेवली. याच्या आड भारतीय हद्दीत हल्ले करण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचे भारती म्हणाले.

१० मे रोजी डीजीएमओचा फोन :  १० मे ला दुपारी साडेतीनच्या सुमारास पाकिस्तानी डीजीएमओचा फोन आला. सायंकाळी ७ नंतर परस्परांवर हल्ले केले जाणार नाहीत, असे ठरले; परंतु काही तासांतच पाकिस्तानने संघर्ष थांबवण्यासाठीचा हा करार मोडला. 

शत्रूची दुखरी नस आम्ही पकडली : जम्मू, उधमपूर, पठाणकोट, डलहौजी, फलौदी या भागात पाकिस्तानने हल्ले केले. आम्ही त्यांची एअर डिफेन्स सिस्टम नष्ट केली. त्यांनी भारतीय हवाई तळांवर आणि लष्करी ठाण्यांवर हल्ले सुरू केल्यावर आम्ही चोख प्रत्युत्तर देत हल्ले केले. त्यांची दुखरी नस असलेल्या एअरबेस कमांड सिस्टम आणि लष्करी हवाई तळांना लक्ष्य केले. भारतीय हवाई दलाने रफिकी, रहरयार खान आणि चकलालामध्ये तुफान हल्ले केले. 

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान