पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 20:27 IST2025-05-20T20:26:15+5:302025-05-20T20:27:19+5:30
Operation Sindoor: आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारतीय शिष्टमंडळ बुधवारपासून परदेश दौऱ्यावर निघणार आहे.

पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्धवस्त केले. आता या ऑपरेशनची माहिती जगाला देण्यासाठी आणि पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यासाठी केंद्र सरकारचे शिष्टमंडळ परदेश दौऱ्यावर जाणार आहे. दरम्यान, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी आज या शिष्टमंडळाला मार्गदर्शन केले. कोणत्या शिष्टमंडळात कोणाचा समावेश आहे, ते जाणून घ्या...
शिष्टमंडळ 1
भाजप खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात भाजप खासदार निशिकांत दुबे, फंगन कोन्याक, रेखा शर्मा, असदुद्दीन ओवेसी (एआयएमआयएम), सतनाम संधू (नामांकित), माजी मंत्री गुलाम नबी आझाद आणि माजी परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ सौदी अरेबिया, कुवेत, बहरीन आणि अल्जेरियाला भेट देईल.
शिष्टमंडळ 2
भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ 2 मध्ये दग्गुबती पुरंदेश्वरी (भाजप), प्रियांका चतुर्वेदी (शिवसेना-यूबीटी), गुलाम नबी खटाना (नामांकित), अमर सिंह (काँग्रेस), समिक भट्टाचार्य (भाजप), माजी केंद्रीय मंत्री एमजे अकबर आणि माजी राजनयिक पंकज सरन यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ युनायटेड किंग्डम, फ्रान्स, जर्मनी, युरोपियन युनियन, इटली आणि डेन्मार्कला भेट देईल.
शिष्टमंडळ 3
प्रतिनिधीमंडळ 3 चे नेतृत्व जेडीयूचे खासदार संजय झा करत आहेत. शिष्टमंडळात अपराजिता सारंगी (भाजप), अभिषेक बॅनर्जी (टीएमसी), ब्रिजलाल (भाजप), जॉन ब्रिटास (सीपीएम), प्रदान बरुआ (भाजप), डॉ हेमांग जोशी (भाजप), काँग्रेस नेते सलमान खुर्शीद आणि राजदूत मोहन कुमार यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ जपान, कोरिया प्रजासत्ताक, सिंगापूर, इंडोनेशिया, मलेशिया येथे जाईल.
प्रतिनिधीमंडळ 4
याचे नेतृत्व शिवसेना नेते श्रीकांत शिंदे करत आहेत. शिष्टमंडळात बन्सुरी स्वराज (भाजप), मोहम्मद बसीर (आययूएमएल), अतुल गर्ग (भाजप), सस्मित पात्रा (बीजेडी), मनन कुमार मिश्रा (भाजप), एस एस अहलुवालिया भाजप नेते आणि राजदूत सुजन चिनॉय यांचा समावेश आहे. हे युएई, काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक, सिएरा लिओन आणि लायबेरियाला जाईल.
शिष्टमंडळ 5
यात शांभवी (एलजेपी रामविलास), सरफराज अहमद (जेएमएम), जीएम हरीश बालयोगी (टीडीपी), शशांक मणी त्रिपाठी (भाजप), भुवनेश्वर कलिता (भाजप), मिलिंद देवरा (शिवसेना), तेजस्वी सूर्या (भाजप) आणि माजी राजनयिक तरनजीत संधू यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ अमेरिका, पनामा, गयाना, कोलंबिया आणि ब्राझीलला जाईल.
शिष्टमंडळ 6
शिष्टमंडळ 6 चे नेतृत्व द्रमुक खासदार कनिमोई करत आहेत. शिष्टमंडळात राजीव राय (समाजवादी पार्टी), अल्ताफ अहमद (नॅशनल कॉन्फरन्स), कॅप्टन ब्रिजेश चौटा (भाजप), प्रेमचंद गुप्ता (आरजेडी), अशोक कुमार मित्तल (आम आदमी पार्टी), आंबेडकर मंजीव पुरी आणि राजदूत जावेद अश्रफ यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ रशिया, स्लोव्हेनिया, ग्रीस, लाटविया आणि स्पेनला जाणार आहे.