ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 14:45 IST2025-06-10T14:44:33+5:302025-06-10T14:45:54+5:30

Lieutenant General Rajeev Ghai: पाकिस्तानी सैन्याने युद्धविरामासाठी ज्या अधिकाऱ्यासमोर जोडले होते हात, त्यांना मिळाली पदोन्नती.

Operation Sindoor; DGMO General Rajeev Ghai promoted, will now work in this position | ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार

ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार

Lieutenant General Rajeev Ghai: पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे पाकला चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या बहावलपूर, मुरीदके येथील अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. तसेच, पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनाही जोरदार प्रत्युत्तर दिले. दरम्यान, या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना पदोन्नती मिळाली आहे. 

उप-लष्कर प्रमुखपदी नियुक्ती
राजीव घई सध्या लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक, म्हणजेच डीजीएमओ म्हणून कार्यरत आहेत. आता त्यांना उप लष्करप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ते दोन्ही पदांवर कायम राहतील. ऑपरेशन सिंदूर दरम्यान नष्ट झालेल्या पाकिस्तानच्या दहशतवादी तळांची सविस्तर माहिती देण्यासाठी राजीव घई मीडियासमोर आले होते.

संरक्षण मंत्र्यालयाची माहिती
संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात घई यांच्या नवीन जबाबदाऱ्यांबद्दल माहिती दिली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, लष्कर-गुप्तचर संस्था आणि लष्करी कारवायांशी संबंधित इतर विभागांमधील चांगले समन्वय आणि सहकार्य यासाठी डीजीएमओ राजीव घई यांना उप-सेनाप्रमुख बनवण्यात आले आहे.

पाकिस्तानी सैन्याने जोडले होते हात
दरम्यान, डीजीएमओ पदावर असताना राजीव घई सैन्य आणि देशाच्या गुप्तचर संस्थांमधील समन्वयाचे काम हाताळतात आणि महत्त्वाच्या लष्करी बाबींवर लष्करप्रमुखांना सल्ला देखील देतात. त्यांना सैन्यातील उत्कृष्ट सेवांसाठी उत्तम युद्ध सेवा पदकदेखील मिळाले आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान राजीव घई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारताच्या जलद हल्ल्यांमुळे घाबरलेल्या पाकिस्तानच्या डीजीएमओने राजीव घई यांनाच फोनद्वारे युद्धविरामाची विनवणी केली होती.

लेफ्टनंट जनरल राजीव घई यांचा अल्पपरिचय
डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई हे कुमाऊँ रेजिमेंटचे लष्करी अधिकारी आहेत. घई यांनी भारतीय सैन्यात अनेक मोठ्या ऑपरेशन्सचे नेतृत्व केले आहे. डीजीएमओ म्हणून नियुक्त होण्यापूर्वी घई चिनार कॉर्प्सचे जीओसी होते. त्यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादाविरुद्ध अनेक लष्करी ऑपरेशन्सचे नेतृत्व केले आहे.

Web Title: Operation Sindoor; DGMO General Rajeev Ghai promoted, will now work in this position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.