पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 06:24 IST2025-05-09T06:23:47+5:302025-05-09T06:24:03+5:30

लाहोर, अटक, गुजरानवाला, चकवाल, रावळपिंडी, बहावलपूर, मियांवाली, छोर, कराची या नऊ शहरांमध्ये हारोप या ड्रोनच्या साहाय्याने अत्यंत भेदक हल्ले गुरुवारी केले.

Operation Sindoor : Attack in Pakistan again; Lahore's defense system destroyed | पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त

पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: पाकिस्तानने भारतातील १५ ठिकाणांवर केलेल्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने तेथील लाहोर, अटक, गुजरानवाला, चकवाल, रावळपिंडी, बहावलपूर, मियांवाली, छोर, कराची या नऊ शहरांमध्ये हारोप या ड्रोनच्या साहाय्याने अत्यंत भेदक हल्ले गुरुवारी केले. इस्रायलने बनविलेले हारोप ड्रोन बराच काळ हवेत घिरट्या घालून योग्य क्षणी हल्ला करू शकतात.

या हल्ल्याच्या प्रतिकार करण्यासाठी भारताने रशियाकडून मिळविलेल्या एस-४०० या हवाई संरक्षण क्षेपणास्त्रप्रणालीचा उपयोग केला व पाकिस्तानचा भारतीय शहरांवर हल्ले करण्याचा डाव उधळून लावला. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, पाकिस्तानने भारतीय सैनिकी ठिकाणांवर ड्रोन व क्षेपणास्त्रांद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केला होता. त्याला उत्तर म्हणून भारतीय सशस्त्र दलांनी लाहोरसह पाकिस्तानमधील काही ठिकाणी असलेल्या हवाई संरक्षण यंत्रणांवर अचूक प्रहार केला व त्या यंत्रणा उ‌द्ध्वस्त केल्या.

लक्ष्य शोधून योग्य त्या क्षणी स्फोट करते आत्मघाती हारोप हे इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीजच्या (आयएआय) मिसाइल डिव्हिजनने विकसित केलेले आत्मघाती ड्रोन आहेत. ते पारंपरिक क्षेपणास्त्र व मानवरहित विमान यांचे मिश्रण आहे. हे ड्रोन दीर्घकाळ हवेत उड्डाण करू शकते, तसेच लक्ष्य शोधून योग्य त्या क्षणी स्फोट घडविते. ते शत्रूच्या रहार स्टेशन, टैंक, कमांड सेंटर, पुरवठा केंद्र यासारख्या लक्ष्यांवर हल्ला करू शकतात. हारोपचे नियंत्रण मानवी हस्तक्षेप असलेल्या प्रणालीच्या माध्यमातून होते. त्यामुळे आवश्यकता भासल्यास ते परत बोलाविता येते.
आयपीएलवर युद्धाचे ढग; धर्मशाळातील सामना थांबवला
भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढल्याने आयपीएलवर युद्धाचे ढग पसरले असून पुढील सामन्यांबद्दल शुक्रवारी निर्णय होणार आहे. गुरुवारचा धर्मशाळातील दिल्ली विरुद्ध पंजाब सामना ब्लॅक आऊटमुळे थांबवण्यात आला.

Web Title: Operation Sindoor : Attack in Pakistan again; Lahore's defense system destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.