पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 23:20 IST2025-05-07T23:20:11+5:302025-05-07T23:20:40+5:30

Operation Sindoor Airstrike on Pakistan: दहशतवाद्यांचा म्होरक्या हाफिज सईदच्या कुटुंबाला संपविण्यात यश आले आहे. यामुळे त्रस्त झालेल्या पाकिस्तानने भारतावर सकाळपासूनच जोरदार गोळीबार, उखळी तोफा डागण्यास सुरुवात केली आहे.

Operation Sindoor Airstrike on Pakistan: Indian soldier martyred in Pakistan firing; Doctors tried hard to save him... | पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...

पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...

बुधवारी पहाटे भारताच्या तिन्ही दलांनी पाकिस्तान आणि त्यांच्या ताब्यातील काश्मीरमध्ये जोरदार हल्ला चढविला होता. या भागातील ९ दहशतवादी ठिकाणे उध्वस्त करण्यात आली आहेत. पहलगाममध्ये विवाहितांना सोडून त्यांच्या समोर त्यांच्या पतीला मारण्यात आले होते. यामुळे भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानच्या पेकाटात लाथ घातली आहे. दहशतवाद्यांचा म्होरक्या हाफिज सईदच्या कुटुंबाला संपविण्यात यश आले आहे. यामुळे त्रस्त झालेल्या पाकिस्तानने भारतावर सकाळपासूनच जोरदार गोळीबार, उखळी तोफा डागण्यास सुरुवात केली आहे. यात भारतीय जवान शहीद झाला आहे. 

पूँछमध्ये पाकिस्तानने गोळीबार केला. यामध्ये भारतीय सैन्याचा जवान दिनेश कुमार शर्मा गंभीर जखमी झाला होता. त्याला जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शर्मा यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतू यात अपयश आले. भारतीय सैन्याने याची माहिती दिली आहे. शर्मा हे हरियाणाचे होते. 

एलओसीवर पाकिस्तानी सैन्याकडून हल्ले सुरुच आहेत. पुँछ, राजौरी आणइ उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला आणि कुपवाडा या भागात हा गोळीबार सुरु ठेवला आहे. यात आतापर्यंत १२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. 

दरम्यान, भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील मुरिदके आणि बहावलपूर येथील लष्करी तळांनाही लक्ष्य केले. या हल्ल्यात लष्कर ए तोयबाचे अनेक दहशतवादी मारले गेले. दरम्यान, पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमधून एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये लष्कर ए तोयबाचा दहशतवादी हाफिझ अब्दुल रौफ हा दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाला आहे. त्याशिवाय पाकिस्तानी सैन्याचे काही अधिकारी आणि पोलीस अधिकारीही यावेळी उपस्थित होते. लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर हाफिझ अब्दुल रौफ हा ऑपरेशन सिंदूरदरम्यान मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाला. 

Web Title: Operation Sindoor Airstrike on Pakistan: Indian soldier martyred in Pakistan firing; Doctors tried hard to save him...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.