शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 06:24 IST

Operation Sindhu Evacuation: मंगळवारी सकाळी ८:२० वाजता अम्मानहून एक चार्टर्ड विमान दिल्ली विमानतळावर उतरले. त्यातून इस्रायलमधील भारतीय मायदेशात परतले.

नवी दिल्ली : इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने मंगळवारी इराणमधून आणि इस्रायलमधून १,१०० भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशात परत आणले. त्यामुळे मायदेशात आणलेल्या भारतीयांची संख्या ३,१७० इतकी झाली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, इराणमधील मशहद शहरातून मंगळवारी पहाटे ३:३० वाजता एक विशेष विमान दिल्ली विमानतळावर उतरले, ज्यातून २९२ भारतीय नागरिक परत आले. यामध्ये २९० भारतीयांसोबत एक श्रीलंकेचा नागरिकही आहे. 

मंगळवारी सकाळी ८:२० वाजता अम्मानहून एक चार्टर्ड विमान दिल्ली विमानतळावर उतरले. त्यातून इस्रायलमधील भारतीय मायदेशात परतले. इस्रायलमधून या भारतीयांना जॉर्डनमध्ये नेण्यात आले व तेथील अम्मानहून ते भारताकडे रवाना झाले. त्यानंतर आणखी काही भारतीय नागरिकांना हवाई दलाच्या विमानाने अम्मानहून दिल्लीमध्ये आणण्यात आले. 

भारतीय विमान कंपन्यांची  मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली

वाढत्या तणावामुळे भारतीय विमान कंपन्यांनी मध्य-पूर्वेतील विमान उड्डाणे तूर्त स्थगित केली आहेत. याचा हजारो प्रवाशांवर परिणाम झाला असून, कंपन्यांनाही फटका बसला आहे.

मध्य-पूर्वेतील काही हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे एअर इंडिया एक्स्प्रेसने या भागातील उड्डाणे तात्पुरती थांबविली आहेत, असे या भागात १५ पेक्षा अधिक ठिकाणी सेवा देणाऱ्या एअरलाईनने म्हटले आहे.

इंडिगोने सांगितले की, सेवा  लवकर सुरू करण्याकडे लक्ष दिले जात आहे. आम्ही परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करीत आहोत. दुबई, दोहातील विमानतळ नेहमीच गजबजलेली असतात. युरोप आणि अमेरिकेला जाणाऱ्या विमानांसाठी ही दोन्ही विमानतळ महत्त्वाची ठरतात.

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलwarयुद्धairplaneविमान