शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

Operation Lotus: ऑपरेशन लोटस ‘ब्रेक’नंतर, आधी मिशन कर्नाटक, मगच महाराष्ट्र अन् बिहारवर टाकणार नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 07:45 IST

Operation Lotus: महाराष्ट्र व बिहारमधील २०२४ साठीचे भारतीय जनता पार्टीचे ‘ऑपरेशन लोटस’ कर्नाटक निवडणुकांपर्यंत म्हणजेच १३ मेपर्यंत पुढे ढकलले असले तरी पुढील महिन्यात भाजप पुन्हा ते अंमलात आणणार आहे.

- संजय शर्मानवी दिल्ली : महाराष्ट्रबिहारमधील २०२४ साठीचे भारतीय जनता पार्टीचे ‘ऑपरेशन लोटस’ कर्नाटक निवडणुकांपर्यंत म्हणजेच १३ मेपर्यंत पुढे ढकलले असले तरी पुढील महिन्यात भाजप पुन्हा ते अंमलात आणणार आहे. महाराष्ट्राबाबत भाजपच्या सर्व नजरा २०२४च्या लोकसभा निवडणुकीवर आहेत. कोणत्याही स्थितीत भाजपला लोकसभेच्या किमान ४० जागा जिंकायच्या आहेत. 

भाजपच्या ज्येष्ठ नेत्याच्या माहितीनुसार, कर्नाटक निवडणुकांनंतर महाराष्ट्रात संपूर्ण ऑपरेशन तडीस नेले जाईल. १० मे रोजी कर्नाटकमध्ये निवडणुका होणार. १३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत. महाराष्ट्र व बिहारमध्ये लोकसभेच्या ४० किंवा ४० पेक्षा जास्त जागा आहेत.

महाराष्ट्रातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूणच भूमिकेबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. यामुळे महाविकास आघाडीचे नेतेही वक्तव्ये देत आहेत. असे असतानाच स्वत: अजित पवार यांनी मात्र जिवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहीन, असे स्पष्ट केले. शरद पवार यांनीही अजित पवार यांच्याबाबत चर्चा चुकीच्या असल्याचे सांगितले असले तरी भाजप नेत्याचा दावा आहे की, राष्ट्रवादीचा एक मोठा गट भाजपबरोबर येऊ शकतो. लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात शिंदे गटाच्या शिवसेनेबरोबर आणखीही पाठिंब्याची गरज आहे.

अमित शाह यांच्याकडे सूत्रेअमित शाह स्वत: महाराष्ट्राच्या ऑपरेशनची सूत्रे हालवत आहेत. अलीकडेच शाह भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या मुंबईतील घरी गेले तेव्हाही हे ऑपरेशन पुढे ढकलल्याची चर्चा सुरू झाली. याच ऑपरेशनमुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्लीत शाह व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली.

बिहारी नेत्यांनाही सबुरीचा सल्ला - दोन दिवसांपूर्वीच उपेंद्र कुशवाह शाह यांना भेटून परतले. त्यांनाही कर्नाटक निवडणुकांपर्यंत थांबण्यास सांगितले.  - माजी मुख्यमंत्री व हिंदुस्तान अवाम मोर्चाचे नेते जितनराम मांझी यांनीही शाह यांची भेट घेतली. त्यांनाही कर्नाटक निवडणुकीपर्यंत थांबण्यास सांगितले. माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती.

टॅग्स :BJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकBiharबिहारAmit Shahअमित शाह