ऑपरेशन काला जंगल; सीमेवर ४ दहशतवाद्यांचा खात्मा, मोठा शस्त्रसाठाही जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 21:57 IST2023-06-23T21:55:24+5:302023-06-23T21:57:47+5:30
उत्तर काश्मीरच्या कुपवाडा येथील सीमावर्ती जिल्ह्यातील माछिल भागात नियंत्रण रेषेजवळ घुसकोरीच्या प्रयत्नात असलेल्या ४ दहशतवाद्यांचा सुरक्षा जवानांनी खात्मा केला.

ऑपरेशन काला जंगल; सीमेवर ४ दहशतवाद्यांचा खात्मा, मोठा शस्त्रसाठाही जप्त
श्रीनगर - कुपवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या चकमकीत ५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. कुपवाडामधील एलओसीच्या जुमागुंडा भागात ही चकमक झाली होती. आता, सुरक्षा दलाने ऑपरेशन काला जंगल सुरू केलं असून या मोहिमेत ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. काश्मीर पोलीस आणि सैन्य दलाने संयुक्तिकपणे ही कारवाई केली आहे. यामध्ये मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. काश्मीर झोन पोलिसांनी ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहितीही दिली आहे.
उत्तर काश्मीरच्या कुपवाडा येथील सीमावर्ती जिल्ह्यातील माछिल भागात नियंत्रण रेषेजवळ घुसकोरीच्या प्रयत्नात असलेल्या ४ दहशतवाद्यांचा सुरक्षा जवानांनी खात्मा केला. आठवडाभरापूर्वी झालेल्या कारवाईनंतर ही आणखी एक मोठा कारवाई करण्यात आली आहे. काश्मीर पोलीस आणि सैन्य दलाने संयुक्तिकपणे ही मोहीत फत्ते केली.
भारतीय सेना और जम्मू-कश्मीर पुलिस द्वारा 22-23 जून की रात माछल सेक्टर में ऑपरेशन काला जंगल चलाया गया। हमने इसमें घुसपैठ कर रहे 4 आतंकवादियों को मार गिराया। हमें इनसे 9 AK रायफल, 14 मैगजीन, 218 कारतूस, 4 हैंड ग्रेनेड, 3 पिस्टल, 5 पिस्टल मैगजीन, करीब 55 किलो नशीला पदार्थ मिला है।… pic.twitter.com/hdUzmOHnxK
— ANI_HindiNews (@AHindinews) June 23, 2023
काश्मीर पोलीस आणि सैन्य दलाने २२-२३ जूनच्या रात्री माछल सेक्टरमध्ये ऑपरेशन काला जंगल मोहीम चालवली. या मोहिमेत ४ दहशतवाद्यांना ठार केले, त्यासोबतच मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. ९ एके रायफल, १४ मॅगेजीन, २१८ काडतुस, ४ हँड ग्रॅनेड, ३ पिस्टल, ५ पिस्टल मॅगझीन यासह अंदाजे ५५ किलो नशेचा पदार्थ मिळून आला आहे.