शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जैश-मोहम्मदचा ऑपरेशन कमांडर खालिदला लष्कराकडून कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 15:42 IST

श्रीनगर - काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या लष्कराच्या मोहिमेला सोमवारी मोठे यश मिळाले. बारामुल्ला येथील लाडोरा येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराने जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा ऑपरेशन कमांडर खालिद याला लष्कराने कंठस्नान घातले. खालिद हा बीएसएफ कॅम्पवर झालेल्या तळावरील हल्ल्याचा मास्टर माईंड होता. काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील लाडोरा येथे लष्कर ...

श्रीनगर - काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या लष्कराच्या मोहिमेला सोमवारी मोठे यश मिळाले. बारामुल्ला येथील लाडोरा येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराने जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा ऑपरेशन कमांडर खालिद याला लष्कराने कंठस्नान घातले. खालिद हा बीएसएफ कॅम्पवर झालेल्या तळावरील हल्ल्याचा मास्टर माईंड होता. काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील लाडोरा येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत लष्कराने कुख्यात दहशतवादी खालिद याला एका शाळेमध्ये घेरले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याआधी झालेल्या चकमकीत खालिद जखमी झाला होता. पायाला जखम झाल्याने तो याच परिसरात अडकला होता. अखेर आज झालेल्या चकमकीत लष्कराने त्याला ठार मारले. खालिद हा पाकिस्तानी नागरिक होता. 

दरम्यान, भारत - पाकिस्तान सीमारेषेवर असणारे भारतीय लष्कराचे जवान दिवसाला पाच ते सहा दहशतवाद्यांचा खात्मा करत आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. तसंच पाकिस्तानने गोळीबार केल्यास त्यांना योग्य ते उत्तर द्या, असा आदेश दिला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राजनाथ सिंह यांनी सांगितलं की, 'भारतीय जवानांना पाकिस्तानवर गोळीबार न करण्याचा आदेश दिला आहे. मात्र जर त्यांनी गोळीबार केल्यास असंख्य गोळ्यांचा वर्षाव करत योग्य ते उत्तर द्या असा आदेश दिला आहे'.

यावेळी राजनाथ सिंह यांनी डोकलाम मुद्द्यावरही भाष्य केलं. 'भारत आता अजिबात दुबळा देश नाही, एक मजबूत देश झाला आहे. चीनसोबत वादग्रस्त मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी भारताचा नेहमीच पुढाकार होता', असं राजनाथ सिंह बोलले आहेत. 

चीनने डोकलाम भागात रस्ता बांधण्याची तयारी पुन्हा सुरू करताच, भारत- चीन सीमेवरील सर्व महत्त्वाच्या खिंडींजवळ जवळपास १00 नवे रस्ते बांधण्याची रणनीती भारत सरकारने तयार केली आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी दुपारी डोकलाम नाथु-ला क्षेत्राचे हवाई सर्वेक्षण केले. सीमावर्ती भागात पहिल्या टप्प्यात महत्त्वाचे २५ रस्ते, तर दुसºया व तिसºया टप्यात प्रत्येकी ५0 नवे रस्ते तयार होणार असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांकडून या दौºयाच्या निमित्ताने प्राप्त झाली.

 

 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिरIndian Armyभारतीय जवानIndiaभारत