पळा, पळा.. मिसाईल पडलं... इस्रायलमध्ये एका मोबाईल App ने वाचवला भारतीयांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 11:38 AM2023-10-13T11:38:49+5:302023-10-13T11:39:20+5:30

Israel Palestine Conflict : इस्रायलमधील हल्ल्यादरम्यान एका एपने त्याच्यासारख्या अनेक भारतीयांना खूप मदत केली.

operation ajay an alert on mobile and the race begins to save lives how an app in israel | पळा, पळा.. मिसाईल पडलं... इस्रायलमध्ये एका मोबाईल App ने वाचवला भारतीयांचा जीव

फोटो - hindi.news18

इस्रायलमधील विद्यार्थ्यांसह सुमारे 200 भारतीय शुक्रवारी पहाटे चार्टेर्ड फ्लाइटने दिल्लीत पोहोचले. गेल्या शनिवारी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यांनंतर या प्रदेशात तणाव पसरला, ज्याचा परिणाम म्हणून भारताने मायदेशी परत येऊ इच्छिणाऱ्यांना परत आणण्यासाठी ऑपरेशन अजय सुरू केले. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिल्ली विमानतळावर प्रवाशांचे स्वागत केले. त्यांनी हात जोडून सर्वांना अभिवादन केलं आणि 'घरी स्वागत आहे' असं म्हटलं. 

विद्यार्थ्यांनी याच दरम्यान न्यूज 18 इंडियासोबत त्यांचे अनुभव शेअर केले आणि क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यान मोबाईल एपने त्यांचा जीव कसा वाचवला ते सांगितलं. त्यांनी सांगितलं की, हल्ल्याचा इशारा मिळताच ते घरातून निघून बंकरमध्ये जायचे. केंद्र सरकारच्या ऑपरेशन अजय अंतर्गत इस्रायलहून खास चार्टर्ड फ्लाइटने आयजीआय विमानतळावर परतलेला पंजाबचा रहिवासी विशेष याने संवाद साधताना सांगितले की, दिल्लीत परत आल्याने मला बरं वाटलं आणि आता मला लवकरात लवकर घरी जायचे आहे. 

इस्रायलमधील हल्ल्यादरम्यान एका एपने त्याच्यासारख्या अनेक भारतीयांना खूप मदत केली. त्याने सांगितलं की, जेव्हा जेव्हा सायरन वाजतो तेव्हा एपवर तुमच्या घरापासून किती अंतरावर बॉम्ब पडला होता हे लोकेशन दिसायचं. इस्रायलमध्ये पडलेल्या सर्व रॉकेटचं लोकेशन एपद्वारे कळालं. विशेषने आपल्या देशात परतल्याबद्दल भारत सरकारचे आभार मानले. सुरक्षितपणे विमानतळावर नेण्यात आले आणि तेथून ते एका विशेष विमानाने भारतात परतले. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही असं त्याने सांगितलं. 

विशेष विमानाने भारतात परतलेल्या रांची येथील रहिवासी विनिता यांनी सांगितले की, मी इस्रायलमध्ये पीएचडी करत आहे. मी गेल्या दीड वर्षापासून तिथे राहत आहे आणि 4 वर्ष मला तिथे राहावं लागणार आहे. मी मध्य इस्रायलमध्ये राहत होतो आणि तिथेही बॉम्बस्फोट झाले होते. जेव्हा-जेव्हा मिसाईल पडत होतं, तेव्हा जीव वाचवण्यासाठी आम्हाला पुन्हा-पुन्हा बंकरमध्ये जावं लागत होतं. विनिताने सांगितलं की, इस्रायलमध्ये जे काही घडत होतं त्यामुळे कुटुंबीय खूप अस्वस्थ झाले होते. 

विनिता म्हणाल्या की, इस्रायली दूतावास खूप चांगला आहे. जेव्हा जेव्हा आम्ही फोन किंवा मेसेज केला तेव्हा आम्हाला मदत मिळाली. ऑपरेशन अजय इतकं चांगलं होतं की चेकिंग सुरळीत पार पडलं आणि आम्ही भारतात आलो. कॉलेजमधून विमानतळावर येताना थोडी अडचण आली, कारण मिसाईल कधी येईल आणि मग बंकर कुठे सापडेल, हे माहीत नाही, असे ते म्हणाले. भारत सरकारच्या या उपक्रमाचे कौतुक करताना विनिता म्हणाल्या की, आम्ही अगदी सहज घरी परतलो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: operation ajay an alert on mobile and the race begins to save lives how an app in israel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.