ओपन नेटवर्क येणार, अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टला कडवी टक्कर देणार, मोदी सरकार आखतेय मोठी योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 04:19 PM2022-04-28T16:19:52+5:302022-04-28T16:20:25+5:30

Open Network: अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या दिग्गज ई-कॉमर्स कंपनीला कडवी टक्कर देण्यासाठी केंद्र सरकारकडून एका मोठ्या योजनेवर काम सुरू आहे. मोदी सरकार लवकरच एक ओपन टेक्नॉलॉजी नेटवर्क (नेटवर्क फॉर ऑल डिजिटल कॉमर्स) आणत आहे.

Open network will come, Amazon-Flipkart will be hit hard, Modi government is planning big plans | ओपन नेटवर्क येणार, अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टला कडवी टक्कर देणार, मोदी सरकार आखतेय मोठी योजना

ओपन नेटवर्क येणार, अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टला कडवी टक्कर देणार, मोदी सरकार आखतेय मोठी योजना

Next

नवी दिल्ली - अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या दिग्गज ई-कॉमर्स कंपनीला कडवी टक्कर देण्यासाठी केंद्र सरकारकडून एका मोठ्या योजनेवर काम सुरू आहे. मोदी सरकार लवकरच एक ओपन टेक्नॉलॉजी नेटवर्क (नेटवर्क फॉर ऑल डिजिटल कॉमर्स) आणत आहे. येथे छोटे व्यापारी आणि ग्राहक सारे काही खरेदी किंवा विक्री करू शकतील. सरकारच्या या योजनेला मूर्त रूप देण्यासाठी इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी हे काम करत आहेत. या ओपन नेटवर्कमुळे अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे. सध्या या दोघांचीही देशातील ऑनलाईन बाजारामध्ये ८० टक्के भारीदारी आहे.

नंदन निलेकणी यांनी सांगितले की, हा एक विचार आहे. ज्याची वेळ आता आली आहे. डिजिटल कॉमर्सच्या एका नव्या उच्च क्षेत्रामध्ये भाग घेण्यासाठी आम्ही लाखो छोट्या विक्रेत्यांचे ऋणी आहोत. यामध्ये सरकारला आधार बायोमेट्रिक आयडी सिस्टिम विकसित करण्यामध्ये मदत मिळत आहे. ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार पालो ऑल्टोस्थित व्हेंचर कॅपिटल फर्म जनरल कॅटलिस्टच मॅनेजिंग पार्टनर हेमंत तनेजा यांनी सांगितले की, सर्व आव्हाने असतानाही निलेकणी या कामासाठी अगदी योग्य व्यक्ती आहेत. तनेजा यांनी पुढे सांगितले की, नंदन आपल्या दुरदृष्टीसाठी ओळखले जातात. तसेच ते या योजनेला अवश्या यशस्वी करतील.

निलेकणी त्या नऊ सदस्यीय सल्लागार परिषदेचा भाग आहेत जी डिजिटल कॉमर्ससाठी तयार करण्यात आलेल्या ओपन नेटवर्कला विकसित करण्यासाठी केंद्र सरकारला सल्ला देईल. निलेकणी यांनी सांगितले की, आम्ही एक नवा अभ्यासक्रम तयार करत आहोत. ज्याचे लक्ष्य ई-कॉमर्स गेमच्या नियमांना बदलणे हे आहे.

ओएनडीसी ओपन प्रोटोकॉलवर आधारित एक टेक्नॉलॉजी नेटवर्क आहे. ते मोबिलिटी, ग्रॉसरी, फूड ऑर्डर आणि डिलिव्हरी, हॉटेल बुकिंग आणि ट्रॅव्हलसारख्या सेगमेंटमध्ये लोकल कॉमर्सला कुठल्याही नेटवर्क, सक्षम अॅप्लिकेशनद्वारे शोधता येऊ शकेल. हे नवे नेटवर्क दिल्ली, बंगळुरू, कोईंबतूर, भोपाळ आणि शिलाँगमधील निवडणक ग्राहकांसाठी सुरू केले जाईल.  

Web Title: Open network will come, Amazon-Flipkart will be hit hard, Modi government is planning big plans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.