शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

केवळ सुमित्रा महाजनच माझे कान उपटू शकतात - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 4:50 AM

खूपच कमी लोकांना ही गोष्ट माहिती आहे की, भाजपमध्ये एकच व्यक्ती माझे कान उपटू शकते आणि ती म्हणजे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, या शब्दांत त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरव केला.

इंदूर : खूपच कमी लोकांना ही गोष्ट माहिती आहे की, भाजपमध्ये एकच व्यक्ती माझे कान उपटू शकते आणि ती म्हणजे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, या शब्दांत त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरव केला. इंदूर येथे आयोजिलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.सुमित्रा महाजन यांचा ‘ताई' असा उल्लेख करून मोदी म्हणाले की, लोकसभाध्यक्ष म्हणून सुमित्रा महाजन यांनी जबाबदारी चोखपणे पार पाडली. त्यांनी व मी अनेक वर्षे भाजपमध्ये एकत्र काम केले आहे. इंदूरच्या विकासाबाबत ताईंची सर्व स्वप्ने आम्ही पूर्ण करू. सुमित्रा महाजन यावेळी व्यासपीठावर होत्या.

वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या नेत्यांनी निवडणुकीस उभे राहू नये, असा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यानुसार मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी यंदा रिंगणात नाहीत. इंदूरमधून आठवेळा निवडून आलेल्या सुमित्रा महाजन ७६ वर्षे वयाच्या असून त्यांना आता उमेदवारी देऊ नये, असा पक्षनेतृत्वाचा विचार होता. उमेदवारीबद्दल बरेच दिवस काही कळविण्यात न आल्याने पक्षनेतृत्व हा निर्णय आपल्याला सांगण्यास संकोचत असावे, हे सुमित्रा महाजन यांच्या लक्षात आले. अखेर त्यांना याबाबत पक्षाला पत्र लिहावे लागले होते. (वृत्तसंस्था)

नाराजीची चर्चाआपणास निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे स्वत: सुमित्रा महाजन यांनी भाजपाध्यक्षांना कळविले होते. त्यामुळे उमेदवार उभा करण्यास तुम्ही मोकळे आहात, असेही त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. त्या नाराज असल्याच्या बातम्याही पसरल्या होत्या. आता इंदूरमधून शंकर लालवानी भाजपचे उमेदवार आहेत. त्यांना सुमित्रा महाजन यांनी पाठिंबा दिला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीindore-pcइंदौरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSumitra Mahajanसुमित्रा महाजन