Only PG doctors are allowed to operate | ‘पीजी’ डॉक्टरांनाच ऑपरेशनची परवानगी

‘पीजी’ डॉक्टरांनाच ऑपरेशनची परवानगी

नवी दिल्ली : आयुर्वेदिक डॉक्टरही आता ऑपरेशन करू शकतील, असे वृत्त आल्यानंतर आयुष मंत्रालयाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे की, याची घोषणा २०१६ मध्येच झाली होती. ५८ प्रकारच्या सर्जिकल प्रक्रियेलाच परवानगी देण्यात आलेली आहे आणि आयुर्वेदात पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या डॉक्टरांनाच या ऑपरेशनची परवानगी असेल. 

नेमके कोणते आयुवेर्दिक डॉक्टर आपरेशन करू शकणार याबाबत संभ्रम निर्माण झालेला असताना मंत्रालयाने हे स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यानुसार, आयुर्वेदाच्या सर्जरीत पदव्युत्तर पदवी (पीजी) करणाऱ्या डॉक्टरांनाच डोळे, नाक, कान, घसा यासह जनरल सर्जरीसाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येईल. या डॉक्टरांना अल्सर, मूत्रमार्गाचे रोग, मोतीबिंदू आदी सर्जरी करण्याचे अधिकार असतील. 

आयएमएने केली टीका
n    या पार्श्वभूमीवर सेंट्रल काउंसिल ऑफ इंडियन मेडिसिनने (सीसीआयएम) स्पष्ट केले आहे की, आयुर्वेदिकची पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण डॉक्टरांनाच ऑपरेशनबाबतचे प्रशिक्षण दिले जाईल. 
n    आयुर्वेद महाविद्यालयात पूर्वीपासूनच शल्य आणि शालक्य हे स्वतंत्र विभाग आहेत. 
n    दरम्यान, या निर्णयावर इंडियन मेडिकल असोसिएशनने टीका केली आहे. आयएमएचे अध्यक्ष डॉ. राजन शर्मा यांनी म्हटले आहे की, यामुळे खिचडी वैद्यकीय प्रणाली तयार होईल. 
n    आयुर्वेदिक डॉक्टरांना ऑपरेशनची परवानगी देऊन सरकार देशातील लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे, अशी टीकाही डाॅ. राजन शर्मा यांनी केली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Only PG doctors are allowed to operate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.