केजरीवालांना फक्त चर्चेत रस - किरण बेदी
By Admin | Updated: January 20, 2015 13:04 IST2015-01-20T11:02:03+5:302015-01-20T13:04:02+5:30
अरविंद केजरीवाल यांना केवळ चर्चेत रस आहे, माझा मात्र कृती करण्यावर विश्वास आहे असे भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी म्हटले आहे.

केजरीवालांना फक्त चर्चेत रस - किरण बेदी
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - 'आप'चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना केवळ चर्चेत रस आहे, माझा मात्र कृती करण्यावर विश्वास आहे असे भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी म्हटले आहे.
चार दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या किरण बेदी यांची काल रात्री भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली. त्यामुळे आता दिल्लीत बेदी विरुद्ध केजरीवाल अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे.
दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी बेदी यांना ट्विटरवरून शुभेच्छा देत त्यांना खुल्या चर्चेचे आव्हान दिले. बेदी यांनी केजरीवाल यांचे हे आव्हान स्वीकारले आहे, मात्र ही चर्चा विधानसभेत करू असे त्या म्हणाल्या. तसेच केजरीवालांना फक्त चर्चेत तर आपल्याला मात्र काम करण्यात रस असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. ही निवडणूक म्हणजे युद्ध नव्हे तर राजकारण आहे. आपले ध्येय साध्य करणे तसेच प्रत्येक काम पूर्ण करणे या गोष्टींमध्ये आपल्तयाला रस आहे, असे त्या म्हणाल्या.
दिल्लीची विधानसभा निवडणूक ७ फेब्रुवारी रोजी होत असून बेदींच्या नेतृत्वात ही निवडणूक लढविली जाईल. पूर्व दिल्लीतील कृष्णनगर मतदारसंघातून त्या निवडणूक लढवणार असून उद्या त्या आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.