शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 17:07 IST

या घटनेसंदर्भात २६ एप्रिल रोजी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती डीएसपी रश्मीत कौर चावला यांनी दिली.

छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) कॅम्पदरम्यान बिगर मुस्लीम विद्यार्थ्यांना नमाज पठण करण्यास भाग पाडल्याच्या आरोपाखाली गुरु घासीदास केंद्रीय विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाला गुरुवारी अटक करण्यात आली. दिलीप झाल असे या प्राध्यापकाचे नाव आहे. तत्पूर्वी, या घटनेसंदर्भात २६ एप्रिल रोजी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती डीएसपी रश्मीत कौर चावला यांनी दिली.

१५९ विद्यार्थ्यांना नमाज पठण करण्यास भाग पाडले -दिलीप झा, सहा प्राध्यापक आणि एका विद्यार्थ्यावर भारतीय न्याय संहिता आणि छत्तीसगड धर्म स्वातंत्र्य कायद्यांतर्गत धर्माच्या आधारावर द्वेष पसरवणे, धार्मिक भावना दुखावणे आणि इतर गुन्ह्यांसाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३१ मार्च रोजी आरोपींनी एनएसएस कॅम्पमधील १५९ विद्यार्थ्यांना नमाज पठण करण्यास भाग पाडले होते. यांपैकी केवळ चार मुस्लीम विद्यार्थी होते. कोटा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शिवतराई गावात २६ मार्च ते १ एप्रिल दरम्यान या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.

कॅम्पमधून परतल्यानंतर विद्यार्थ्यांकडून घटनेचा निषेध -कॅम्पमधून परतल्यानंतर विद्यार्थ्यांनी झालेल्या घटनेचा निषेध केला. तसेच, हिंदू संघटनांनीही आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. यानंतर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला. बिलासपूरचे एसपी रजनीश सिंह यांनी चार सदस्यांची समिती स्थापन केली होती. शहर अधीक्षक (कोतवाली) अक्षय सबादरा यांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी करण्यात आली. समितीच्या अहवालाच्या आधारे झा आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच इतर लोकांविरुद्धही चौकशी सुरू असल्याचे चावला यांनी सांगितले. 

टॅग्स :NamajनमाजMuslimमुस्लीमProfessorप्राध्यापकPoliceपोलिस