देशात केवळ दिल्ली मॉडेलचीच चर्चा- केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 09:04 IST2022-04-13T09:04:27+5:302022-04-13T09:04:54+5:30

दिल्ली सरकारने कांतीनगरात बांधलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्येष्ठ नागरिक निवासच्या इमारतीचे उद्घाटन केजरीवाल यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

Only Delhi model discussed in the country says arvind Kejriwal | देशात केवळ दिल्ली मॉडेलचीच चर्चा- केजरीवाल

देशात केवळ दिल्ली मॉडेलचीच चर्चा- केजरीवाल

नवी दिल्ली :

विकासाची चर्चा होताना देशात केवळ दिल्ली मॉडेलचीच चर्चा होत आहे, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारला दिल्लीत केला.

दिल्ली सरकारने कांतीनगरात बांधलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्येष्ठ नागरिक निवासच्या इमारतीचे उद्घाटन केजरीवाल यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी दिल्लीचे सामाजिक न्यायमंत्री राजेंद्रपाल गौतम, महिला व बालविकास विभागाचे सचिव संदीपकुमार उपस्थित होते. 

केजरीवाल यांनी दिल्ली मॉडेलबद्दल आता लोकांना सांगावे लागत नाही. पंजाबच्या लोकांना आधीच दिल्ली मॉडेलची माहिती होती. त्यामुळेच तेथे आपची सत्ता आली. दिल्ली मॉडेलची कीर्ती आता देशात पोहोचली आहे. विकास म्हणजे दिल्ली मॉडेल, असे आता लोक म्हणून लागले आहे. हे केवळ दिल्लीतील लोकांमुळे शक्य झाल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नसल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थयात्रा योजना पुन्हा सुरू करण्यात येत आहे. दिल्ली सरकारने बांधलेल्या या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्येष्ठ निवासमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्व सोयीसुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत.

Web Title: Only Delhi model discussed in the country says arvind Kejriwal