भाजप सशक्त झाला तरच देश बलवान होईल
By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:08+5:302014-12-25T22:41:08+5:30

भाजप सशक्त झाला तरच देश बलवान होईल
>गडकरी यांचे प्रतिपादन : सदस्यता मोहिमेचा शुभारंभनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सशक्त भारत बनविण्याचा संकल्प असून भाजप सशक्त झाला तरच देश बलवान होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केले. दक्षिण नागपूर तुकडोजी पुतळा चौकात आयोजित कार्यक्र मात त्यांच्या हस्ते भाजपच्या दक्षिण नागपूर क्षेत्रातील सदस्य नोंदणीला सुरुवात करण्यात आली.माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस सुशासन दिवस म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला आहे. त्यांना व स्वातंत्र्य सेनानी पंडित मदन मोहन मालवीय यांना भारतरत्न या सवार्ेच्च पुरस्कार जाहीर केला आहे. ही प्रेरणादायी बाब आहे. सुशासनातून लोकांना चांगल्या सेवा उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याला गडकरी यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. आमदार सुधाकर कोहळे यांनी दक्षिण नागपुरातून एक लाख सदस्य होतील अशी ग्वाही दिली. व्यासपीठावर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, कृष्णा खोपडे, गिरीश व्यास, नासुप्रचे विश्वस्त डॉ. रवींद्र भोयर, संजय भेंडे, राजेश बागडी, नगरसेवक सतीश होले, नीता ठाकरे, दिव्या घुरडे, स्वाती आखतकर, रिता मुळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)