शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

"माझ्यासाठी देशात फक्त ४ जाती; त्यांच्या विकासासाठी..."; पंतप्रधानांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 1:50 PM

मूळ जाती-धर्माच्या पलिकडे विचार करुन या ४ जातींच्या प्रगतीनेच देशाचा विकास होईल, असेही मोदींनी म्हटले. 

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी विकसित भारत संकल्प यात्रेला संबोधित केले. यावेळी, बोलताना मोदींनी जातीय समीकरणावर भाष्य केलं. मात्र, आपण देशात केवळ चार जाती मानत असल्याचं मोदींनी म्हटलं. मोदींनी कुठल्याही जातीचा उल्लेख न करता, केवळ गरीब, युवा, महिला आणि शेतकरी याच चार जाती देशात असल्याचं मोदींनी म्हटलं. या चारही जातींच्या बळकटीसाठी, विकासासाठी आपण काम करत आहोत. आस्था आणि मूळ जाती-धर्माच्या पलिकडे विचार करुन या ४ जातींच्या प्रगतीनेच देशाचा विकास होईल, असेही मोदींनी म्हटले.    

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजला असून ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये जातनिहाय जनगणना करणार असल्याचं आश्वासन काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधींनी दिलं. बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करण्यात आली आहे. तसेच, तेथील नितीशकुमार सरकारने जातनिहाय जनगणनाही केली आहे. त्यामुळे, देशात निवडणुकांच्या तोंडावर जातीय समीकरण जोडली जात आहेत. जातीय व आरक्षणाच्या लाभाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जातींबद्दल मोठं विधान केलं आहे.  माझ्यासाठी सर्वात मोठी जात आहे गरीब, युवा, महिला आणि माझ्यासाठी सर्वात मोठी जात आहे ती शेतकरी, असे म्हणत मोदींनी मानवतेच्या नजरेतून जातीची वर्गवारी केली आहे. तसेच, या चार जातींच्या उद्धार झाल्यास देश विकसित होईल, असे मोदींनी म्हटले. ही जी संकल्प यात्रा घेऊन मी जात आहे, त्याचा उद्देश एकमेव आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या प्रतिक्रिया मला ऐकून घ्यायच्या आहेत. त्यांचा अनुभव मला ऐकायचा आहे. तसेच, ज्यांना लाभ मिळाला नाही, त्यांना पुढील ५ वर्षात शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यायचा आहे, असे मोदींनी म्हटले. 

देशाच्या प्रत्येक गावात मोदींच्या विकासाची गॅरंटी देणारी गाडी पोहोचणार आहे. विकसित भारत संकल्प यात्रेला आज १५ दिवस पूर्ण झाले आहेत, असेही मोदींनी सांगितले, आम्ही या गाडीचं नाव विकासरथ असं ठेवलं होतं. पण, गेल्या १५ दिवसांत लोकांनीच या गाडीचं नामांतर केलं असून मोदी की गॅरंटीवाली गाडी असं नवं नाव ठेवण्यात आलं आहे. मला हे पाहून अधिक आनंद झाला की तुमचा माझ्यावर विश्वास आहे. म्हणूनच, मी तुम्हाला विश्वास देतो की, तुम्हाला दिलेल्या सर्वच गॅरंटी पूर्ण करणार आहे, असे मोदींनी म्हटले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCaste certificateजात प्रमाणपत्रWomenमहिलाFarmerशेतकरी