शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींविरोधात आता उरले केवळ 25 प्रतिस्पर्धी, 5 जणांचे अर्ज मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 19:30 IST

वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पाच जणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे मोदींविरोधात आता केवळ 25 प्रतिस्पर्धी मैदानात उरले आहेत. 

वाराणसी - पंतप्रदान नरेंद्र मोदी हे वाराणसी येथून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. वाराणसीमध्ये नरेंद्र मोदींविरोधात कुठल्याही राजकीय पक्षाने मोठ्या नेत्याला मैदानात उतरवलेले नाही. मात्र या मतदारसंघातून मोदींविरोधात  मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. पैकी 71 अर्ज निवडणूक आयोगाने बाद ठरवले. तर पाच जणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे मोदींविरोधात आता केवळ 25 प्रतिस्पर्धी मैदानात उरले आहेत. वाराणसी लोकसभा मतदारसंघात शेवटच्या टप्प्यामध्ये 19 मे रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, येथून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. आज श्याम नंदन (जनता पार्टी), अर्जुन राम शंकर (जनसंघर्ष विराट पार्टी) राजेंद्र गांधी (अपक्ष), राजकुमार सोनी (अपक्ष) आणि संजय विश्वकर्मा (कांशीराम बहुजन दल) यांनी आपापला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता  वाराणसी लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एकूण 26 उमेदवार मैदानात उरले आहेत.  वाराणसी येथून निवडणूक लढवत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काँग्रेसने अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. तर सपा-बसपा आघाडीने काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे माजी उपसभापती श्यामलाल यादव यांची सून शालिनी यादव यांना समाजवादी पक्षाकडून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर महाआघाडीने बीएसएफमधील बरखास्त जवान तेज बहादूर यांना आपला उमेदवार बनवले होते. मात्र तेज बहादूर यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने फेटाळल्याने शालिनी यादव पुन्हा एकदा महाआघाडीच्या उमेदवार बनल्या आहेत. आता वाराणसी येथे मोदींच्या विरोधात 25 उमेदवार मैदानात असले तरी मुख्य लढत ही नरेंद्र मोदी, काँग्रेसचे उमेदवार अजय राय आणि महाआघाडीचे उमेदवार शालिनी यादव यांच्यामध्येच होणार आहे.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीvaranasi-pcवाराणसीBJPभाजपाcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक