शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदारांचा उत्साह; सकाळपासूनच लांब रांगा
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
5
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
6
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
7
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
8
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
9
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
10
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
11
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
12
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
13
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
14
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
15
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी
16
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
17
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
18
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
19
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
20
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 

चांद्रयान-2 चं थेट प्रक्षेपण पाहायचं आहे, मग इथे करा ऑनलाइन नोंदणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 10:38 AM

चांद्रयान-2 चे थेट प्रक्षेपण सर्वसामान्यांना पाहता यावे यासाठी इस्रोने खास व्यवस्था केले आहे.

श्रीहरिकोटा  - भारताची दुसरी चांद्र मोहीम असलेल्या चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणाची तयारी सध्या जोरात सुरू आहे. चांद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी इस्रोने कंबर कसली आहे. 14 आणि 15 जुलैदरम्यान रात्री दोन वाजता चांद्रयान -2 चे प्रक्षेपण होणार असून, त्याचे थेट प्रक्षेपण सर्वसामान्यांना पाहता यावे यासाठी इस्रोने खास व्यवस्था केले आहे. ज्यांना चांद्रयान-2 चे थेट प्रक्षेपण पाहायचे आहे, अशा सर्वसामान्य नागरिकांसाठी ऑनलाइन नोंदणीची सोय इस्रोने केली असून, आज मध्यरात्रीपासून इस्रोच्या संकेतस्थळावर ही नोंदणी करता येणार आहे.  सध्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रामध्ये चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणाच्या तयारीवर अंतिम हात फिरवण्यात येत आहे. मंगळवारी चांद्रयान-2 ची रेडिओ फ्रिक्वेंसी तपासण्यात आली. तसेच इक्विमेंट-बे कॅमेराही लावण्यात आला. तसेच सर्व पेलोड्सच्या असेंब्लिंगचीही तपासणी करण्यात आली. 14 जून रोजी यू. आर. राव सॅटेलाइट सेंटर येथून चांद्रयान-2 चे ऑर्बिटर श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात पाठवण्याता आले होते. हे ऑर्बिटर 15 जून रोजी श्रीहरिकोटा येथील लाँच पोर्टवर पोहोचले होते.  इस्रोची दुसरी चांद्रमोहीम असलेले चांद्रयान-2 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असलेल्या 2 क्रेटर मॅजिनस सी आणि सिंपेलिनस एन यांच्यामध्ये असलेल्या मैदानी प्रदेशात हे यान उतरणार आहे. या प्रदेशामध्ये याआधी कुठल्याही देशाने आपली चांद्रमोहीम आखलेली नाही. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील हा भाग नेहमी अंधारात असतो. त्यामुळे येथे पाणी असण्याची शक्यता अधिक आहे. त्याबरोबरच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील क्रेटर हे खूप थंड आहेत. त्यामुळे सौरमालेबाबतचे काही जुने जिवाश्म मिळण्याची शक्यता आधिक आहे.  

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2isroइस्रोIndiaभारत