शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
4
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
5
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
6
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
7
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
8
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
9
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
10
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
11
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
12
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
13
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
14
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
15
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
16
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
17
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
18
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
19
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 10:36 IST

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान १२ जून रोजी क्रॅश झाले. हे विमान मीच क्रॅश केल्याचा एक ईमेल बीजे कॉलेजला आला होता.

प्रेम हे आंधळ असतं असं बोलतात, आपलं प्रेम मिळवण्यासाठी अनेकजण काहीही करतात. पण,  जर प्रेमात धोका मिळाला तरीही काहीजण बदला घेत असतात. अशीच एक घटना चेन्नईतून समोर आली आहे. येथे एका तरुणीने बदला घेण्यासाठी मोठीच शक्कल लढवली. तरुणीच्या या कारमानामुळे एका राज्यातील नाहीतर तब्बल १२ राज्यातील पोलिस कामाला लागले. फक्त पोलिसच नाहीतर गुप्तचर यंत्रणा सुद्धा कामाला लागल्या होत्या. तरुणीने तरुणाच्या नावाच्या बऱ्याच ईमेल आयडी तयार केल्या. या आयडीवरुन या तरुणीने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमसह १२ राज्यात २१ पेक्षा जास्त वेळा बॉम्बच्या खोट्या धमक्या दिल्या. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीला चेन्नईमधून अटक केली आहे. 

Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती

पोलिसांनी चेन्नईतील रेने जोसिल्डा या तरुणीला अटक केली. ती रोबोटिक्समध्ये प्रशिक्षित अभियंता आहे आणि चेन्नईच्या एका बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर काम करते. काही दिवसापूर्वी एअर इंडियाचे विमान कोसळल्यानंतर, तिने तिच्या प्रियकराच्या नावाने एक ईमेल पाठवला, यामध्ये एअर इंडियाचे विमान मीच क्रॅश केल्याचा दावा केला.

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचे तिचा सहकारी दिविज प्रभाकरशी एकतर्फी प्रेम झाले, पण, फेब्रुवारीमध्ये प्रभाकरने दुसऱ्याच तरुणीसोबत लग्न केले, त्यानंतर रेने हिने बदला घ्यायचं ठरवलं. तिने प्रभाकरच्या नावाने अनेक ईमेल तयार केले आणि त्यांच्याकडून बनावट बॉम्ब धमकीचे ईमेल पाठवू लागली. तरुणी तांत्रिकदृष्ट्या हुशार असल्याने, तिने पोलिसांपासून वाचण्यासाठी डार्क वेब आणि व्हर्च्युअल आयडीचा चांगला वापर केला. शेवटी पोलिसांनी तिला शोधून काढले.

एअर इंडिया क्रॅश केल्याचा दावा

अहमदाबाद विमान अपघातानंतर, जेव्हा बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये गोंधळ उडाला होता, तेव्हा रेनेने कॉलेजला एक ईमेल पाठवला होता. यामध्ये म्हटले होते की, आता तुम्हाला शक्ती समजली असेलच. काल ज्याप्रमाणे ईमेल पाठवण्यात आला होता, त्याचप्रमाणे आज एअर इंडियाचे विमान कोसळले. मला माहित आहे की पोलिसांनी तो खोटी धमकी समजून त्याकडे दुर्लक्ष केले असेल. आम्ही खेळ खेळत नाही.

या तरुणीने दिल्ली, पंजाब, बिहार, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात आणि हरयाणा येथील वेगवेगळ्या ईमेल आयडीवरून बनावट बॉम्ब धमक्या पाठवल्या. हे सर्व ईमेल मे ते जून २०२५ दरम्यान पाठवण्यात आले होते.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAir Indiaएअर इंडिया