चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 19:43 IST2025-05-14T19:42:04+5:302025-05-14T19:43:01+5:30
हेअर ट्रान्सप्लांटनंतर विनितला गंभीर इन्फेक्शन झालं आणि काही दिवसांतच त्याचा मृत्यू झाला असा आरोप आहे.

चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन रुग्णांच्या संशयास्पद मृत्यूनंतर डॉ. अनुष्का तिवारीने क्लिनिक बंद केलं आहे. तसेच ती पोलीस चौकशी देखील टाळत आहे. पॉवर हाऊसमध्ये इंजिनिअर असलेल्या विनीत दुबे यांच्या पत्नीने अनुष्काविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. हेअर ट्रान्सप्लांटनंतर विनितला गंभीर इन्फेक्शन झालं आणि काही दिवसांतच त्याचा मृत्यू झाला असा आरोप आहे.
आता आणखी एक भयंकर समोर आली आहे. अनुष्काकडून उपचार करून घेतल्यानंतर फर्रुखाबाद येथील मयंक कटिहार यांचाही मृत्यू झाला. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी मयंक यांचं हेअर ट्रान्सप्लांट झालं. त्यांची आई प्रमोदिनी कटिहार म्हणाल्या की, सुरुवातीला मुलाला थोड्या वेदना होत होत्या पण नंतर त्याचा चेहरा खूप सुजू लागला. कुटुंब काळजीत पडले आणि डॉक्टरांना वारंवार फोन करू लागलं. तेव्हा डॉक्टरांनी हे सर्व नॉर्मल असल्याचं सांगून दुर्लक्ष केलं.
मुलाची प्रकृती आणखी बिकट झाली. चेहरा सुजला, डोळे बाहेर येऊ लागले. डॉक्टरांनी त्याला हार्ट स्पेशलिस्टला दाखवण्याचा सल्ला दिला, पण रिपोर्ट नॉर्मल आला. यानंतर डॉक्टरांनी मयंकला पुन्हा क्लिनिकमध्ये बोलावलं, जिथे काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. तो वेदनेने तडफडत होता. आईच्या कुशीतच त्याने जीव सोडला.
कुटुंबातील सदस्यांचा आरोप आहे की, मृत्यूनंतर डॉक्टरांनी सर्व नंबर ब्लॉक केले आणि संपर्क तोडला. मयंकच्या कुटुंबाने आता न्यायासाठी मागितला आहे आणि कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. डॉ. अनुष्काचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.