शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एक साधू चढला मोबाइल टॉवरवर, दुसऱ्याने पेटवून घेतले; नेमकं काय आहे प्रकरण..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 14:50 IST

राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात गेल्या 550 दिवसांपासून साधूंचे आंदोलन सुरू आहे.

भरतपूर:राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील भगवान कृष्णाचे क्रीडांगण असलेल्या आदिबाद्री परिसरात अवैध खाणकाम थांबवण्याची मागणी करत बाबा हरिबोल दास मंगळवारी मोबाईल टॉवरवर चढले. 24 तास उलटूनही बाबा हरिबोल दास टॉवरवरुन उतरले नाहीत. सरकारने या भागातील खाणकाम बंद करून ते वनक्षेत्र घोषित करावे, अशी त्यांची अट आहे. या मागणीबाबत बाबा हरिबोल दास यांनी दोन दिवसांपूर्वी आत्मदहनाचा इशाराही दिला होता. 

550 दिवसांपासून आंदोलन त्यांच्या इशाऱ्यानंत राजस्थान सरकारचे कॅबिनेट मंत्री विश्वेंद्र सिंह त्यांचे मन वळवण्यासाठी आले होते. साधू आणि मंत्री यांच्यात संवाद झाला, मात्र त्यावर बाबा हरिबोल दास यांचे समाधान झाले नाही आणि ते मंगळवारी मोबाईल टॉवरवर चढले. आदिबद्री भागातील खाणकाम बंद करण्याच्या मागणीसाठी गेल्या 550 दिवसांपासून साधूंचे आंदोलन सुरू आहे. मात्र आजपर्यंत यावर तोडगा निघालेला नाही.

एका साधूने स्वतःला पेटवून घेतलेदरम्यान, याप्रकरणी ठिय्या आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी एका साधूने ज्वलनशील पदार्थ ओतून स्वतःला पेटवून घेतले. यामुळे ते गंभीर भाजले. त्यांना गंभीर अवस्थेत प्रशासनाने डीईजी रुग्णालयात दाखल केले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे आता पोलीस प्रशासनात घबराट पसरली आहे. साधू आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. पळसोपा गावात साधू-संतांचे हे आंदोलन सुरू आहे.

या परिक्रमा मार्गात श्रीकृष्णाची अनेक मंदिरे ज्या भागात अवैध उत्खनन होत आहे, तो परिसर गोवर्धन परिक्रमा मार्गाचा परिसर आहे. हा परिसर भगवान श्रीकृष्णाचे क्रीडांगण मानला जातो. हा उत्तर प्रदेशातील मथुरेजवळ आहे. गोवर्धन पर्वताच्या या परिक्रमा मार्गात भगवान श्रीकृष्णाशी संबंधित अनेक मंदिरे आहेत कृष्णाच्या या भूमीला वाचवण्यासाठी साधू संत अनेक वर्षांपासून झटत आहेत, मात्र त्यांचे ऐकले जात नाही. आता हे प्रकरण बाबा हरिबोल दास टॉवरवर चढल्यामुळे सोशल मीडियातही चर्चेत आले आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीagitationआंदोलन