शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरमधील उरी येथे सुरू असलेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2017 10:17 IST

जम्मू काश्मिरमधील उरी येथे सुरू असलेल्या चकमकीत लष्कराने एक दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथे लष्कराने तीन ते चार दहशतवाद्यांना घेरले असून, दोन्हीकडून जोरदार गोळीबार सुरू आहे. लष्कराने संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे.

श्रीनगर, दि. 24 -  जम्मू काश्मिरमधील उरी येथे सुरू असलेल्या चकमकीत लष्कराने एक दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथे लष्कराने तीन ते चार दहशतवाद्यांना घेरले असून, दोन्हीकडून जोरदार गोळीबार सुरू आहे. लष्कराने संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे. तसेच स्थानिक नागरिकांना चकमक सुरू असलेल्या ठिकाणापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.  जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस.पी. वैद यांनी काश्मीरमध्ये लष्कर आणि पोलिसांकडून सुरू असलेले ऑपरेशन ऑल आऊट बऱ्यापैकी यशस्वी झाल्याचे सांगितले. तसेच काश्मीर खोऱ्यातील विशेषत: दक्षिण काश्मिरमधील परिस्थिती लवकरच सामान्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केली. तसेच दहशतवादाच्या मार्गाने जाऊन हातात हत्यार घेणाऱ्या काश्मिरी तरुणांनी दहशतवादाचा रस्ता सोडावा, असे आवाहन त्यांनी केले.   दरम्यान,  पाकिस्तानी सैन्याने जम्मू, सांबा आणि पूंछ जिल्ह्यात भारतीय सीमांवरील चौक्या, तसेच नागरी वस्त्यांवर रात्रभर गोळीबार केला. यात बीएसएफचे दोन जवान आणि पाच गावकरी जखमी झाले. सीमावर्ती भागातील २० गावांना पाकिस्तानने लक्ष्य केल्याने, या भागातील शेकडो लोकांना घर सोडून जावे लागत आहे. गत काही दिवसांत अरणिया आणि आरएस पुरा या भागातील २० हजार लोकांनी गाव सोडले आहे.अधिका-यांनी सांगितले की, पाकिस्तानी सैन्याने अरणिया, आरएस पुरा आणि रामगढ सेक्टरमध्ये शुक्रवारी सायंकाळपासून गोळीबार सुरूकेला. गोळीबारात आरएस पुरा सेक्टरच्या सतोवाली गावात तीन लोक जखमी झाले. अरणिया सेक्टरमध्ये एक जण जखमी झाला. सांबाच्या रामगढ सेक्टरमध्ये बीएसएफचे दोन जवान जखमी झाले. पूंछ भागात पाकच्या गोळीबारात ८ वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. पोलिसांनी ५०० हून अधिक लोकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. त्यांना शिबिरात ठेवले आहे.पाकिस्तानने १३ ते १८ सप्टेंबर सातत्याने गोळीबार केला. दोन दिवसांनंतर, २१ तारखेपासून गोळीबार सुरू झाला आहे. त्यात बीएसएफचा एक जवान शहीद झाला, तर एका नागरिकाचा मृत्यू झाला. या वर्षी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच्या २८५ घटना घडल्या आहेत. ही संख्या २०१६ मध्ये २२८ होती. सीमेवर सतत होणा-या गोळीबारामुळे अनिता कुमार यांच्यासारखी अनेक कुटुंबे भीतीच्या छायेत जगत आहेत. त्यांना गुरुवारी रात्री घरात पलंगाखाली लपून राहावे लागले. या गोळीबाराला त्रासून घर सोडण्याचा निर्णय त्यांनी शुक्रवारी घेतला.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानTerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू काश्मिर