शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

Goa: इस्रायलच्या विमानात होते २७६ प्रवासी... हवेतच इंजिन फेल झालं... भारतीय नौदल एका हाकेवर मदतीला धावलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 13:24 IST

Israel-bound flight made emergency landing in Navy airfield : अल एल एअरलाइन्सचे 082 विमान बँकॉकहून तेल अवीवला जात होते आणि त्यात 276 प्रवासी होते, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

नवी दिल्ली : गेल्या सोमवारी इस्रायलच्याविमानाचे इंजिन हवेतच बंद पडले. या आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी भारतीय नौदल एका हाकेवर मदतीला धावले. दरम्यान, थायलंडहून इस्रायलला जाणाऱ्या अल एल एअरलाइन्सच्या विमानाचे गोव्यात इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. भारतीय नौदलाद्वारे संचालित डेबोलिन एअरफील्डवर या विमानाचे 1 नोव्हेंबरला इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानात 276 प्रवासी होते. 

यासंदर्भात भारतीय नौदलाने बुधवारी ट्विटरवर सांगितले की, विमानाचे एक इंजिन बंद झाले होते, त्यामुळे 1 नोव्हेंबरच्या पहाटे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. तसेच, अल एल एअरलाइन्सचे 082 विमान बँकॉकहून तेल अवीवला जात होते आणि त्यात 276 प्रवासी होते, असे ट्विटमध्ये म्हटले आहे. याचबरोबर, एअरफील्ड अपग्रेडेशनच्या कामामुळे बंद आहे, परंतु त्यांच्या अल्प सूचनेवर विमानाला इमर्जन्सी लँडिंगसाठी हे उपलब्ध करून दिले, असेही नौदलाने एका ट्विटमध्ये म्हटले आहे.  

दरम्यान, गोवा विमानतळाचे संचालक गगन मलिक यांनी सांगितले होते की, सोमवारी पहाटे 4 वाजता इस्रायलच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी मंगळवारी संध्याकाळी पर्यायी विमानाने तेल अवीवकडे रवाना झाले. तसेच, इस्रायल विमानाच्या वैमानिकाच्या लक्षात आले की विमानाचे इंधन गळतीचे संकेत चालू झाले आहेत, त्यामुळे त्याला प्रोटोकॉलनुसार प्रभावित इंजिन बंद करावे लागले आणि आपत्कालीन लँडिंग करण्याची परवानगी मागितली, असे मलिक म्हणाले. 

टॅग्स :airplaneविमानIsraelइस्रायलgoaगोवाindian navyभारतीय नौदल