गोहत्येच्या संशयावरून मारहाणीत एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 02:46 AM2019-09-24T02:46:21+5:302019-09-24T06:53:43+5:30

झारखंडमधील घटना; दोन जण गंभीर जखमी

One dies in beating | गोहत्येच्या संशयावरून मारहाणीत एकाचा मृत्यू

गोहत्येच्या संशयावरून मारहाणीत एकाचा मृत्यू

Next

खुंटी : गोहत्या केल्याच्या संशयावरून जमावाने केलेल्या जबर मारहाणीत एका दिव्यांग इसमाचा बळी गेला, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. झारखंडमधील खुंटी जिल्ह्यामध्ये रविवारी हा प्रकार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

जलतंगा गावी नदीच्या किनारी कलंतूस बार्ला, फागू कच्छप, फिलीप होरो या तिघांना गायीच्या मृतदेहासह गावकऱ्यांनी पाहिले. त्यामुळे संतापलेल्या जमावाने केलेल्या जबर मारहाणीत तिघेही गंभीर जखमी झाले होते. त्यातील कलंतूस बार्ला याला रुग्णालयात नेले जात असताना तो वाटेतच मरण पावला. फागू, फिलीप या दोन जखमींना रांची येथील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या पाच जणांंना सोडून द्यावे, अशी मागणी करीत गावकऱ्यांनी कर्रा पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. गुन्ह्यात कोणताही सहभाग न आढळल्यास या पाच जणांना सोडण्यात येईल, असे आश्वासन वरिष्ठ पोलीस अधिकारी ऋषभ झा यांनी संतप्त गावकºयांना दिल्यानंतर हा घेराव मागे घेण्यात आला.

या मारहाणीत पाच जणांचा सहभाग असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले असल्याचे पोलीस उपमहानिरीक्षक वेणुकांत होमकार यांनी सांगितल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. ही घटना घडली त्या ठिकाणी तपासणी केली असता पोलिसांना गायीचा मृतदेह आढळून आला नाही. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. (वृत्तसंस्था)

हिंसाचार रोखण्यात सरकार अपयशी
देशामध्ये गोहत्या केल्याच्या संशयावरून जमावाने जबर मारहाणीद्वारे एखाद्या व्यक्तीचा बळी घेण्याचे प्रकार वाढीला लागले आहेत.
मोदी सरकारच्या काळात अशा प्रकारांना बळ मिळत असल्याचा आरोप काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी याआधी केला होता.
झारखंडमध्ये जादूटोणा केल्याच्या, तसेच गोहत्येच्या संशयावरून एखाद्याला मारहाणीद्वारे ठार मारण्याचे प्रकार घडत असतात. त्यांना आळा घालण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याचीही टीका होत आहे.

Web Title: One dies in beating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.