शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 10:19 IST

Jagan Mohan Reddy Convey Accident Case: १८ जून रोजी एका रॅलीमध्ये माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या कारखाली चिरडून एकाचा मृत्यू झाला.

आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात वायएसआर काँग्रेस पक्षाच्या रॅलीत एका कारने ५५ वर्षीय व्यक्तीला चिरडले. त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर चार दिवसांनी एक धक्कादायक व्हिडिओही समोर आला. व्हिडिओमध्ये, त्या व्यक्तीला एका कारखाली चिरडले जात असल्याचे दिसून येते या कारमध्ये माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी स्वतः बसले होते. या प्रकरणी आता आणखी एक अपडेट समोर आली आहे. रेड्डी यांच्यावर या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला

माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी बुधवार, १८ जून रोजी पालनाडू जिल्ह्यातील ताडेपल्ली ते रेंटपल्ला येथे रॅलीत उपस्थित होते. वायएसआरसीपीच्या एका पदाधिकाऱ्याने पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी रेड्डी आले होते. यावेळी शहरात रॅली काढण्यात आली. या रॅलीवेळी माजी मुख्यमंत्री रेड्डी यांच्या कारखाली चिरडून एका कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला.

विविध पुराव्यांचे विश्लेषण केल्यानंतर, मृत व्यक्ती माजी मुख्यमंत्री रेड्डी यांच्या वाहनाच्या चाकाखाली असल्याचे आढळून आले," असे गुंटूर जिल्हा पोलिस अधीक्षक एस सतीश कुमार यांनी रविवारी रात्री पत्रकार परिषदेत सांगितले. 

पोलिसांनी सांगितले की, सिंगैया नावाच्या वृद्ध व्यक्तीला गंभीर रक्तस्त्राव झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.  स्थानिक पोलिस ठाण्यात त्यांची पत्नी चिली लुर्धू मेरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सुरुवातीला बीएनएसच्या कलम १०६(१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

सीसीटीव्ही झाला व्हायरल

या घटनेचा सीसीसी फुटेज आणि ड्रोन फुटेज समोर आल्यानंतर त्याचे विश्लेषण झाले. यानंतर, पोलिसांना हा अपघात जगन मोहन रेड्डी यांच्या ताफ्यातील कारखाली चिरडून अपघात झाल्याचे समोर आले.

यानंतर पोलिसांनी प्रकरणात कलमामध्ये बदल करुन  कलम १०५ लावले. या प्रकरणी आणखी तपास सुरू आहे. इतर आरोपींमध्ये जगन मोहन रेड्डी यांचे ड्रायव्हर रमणा रेड्डी, वैयक्तिक सहाय्यक के नागेश्वर रेड्डी, वरिष्ठ वायएसआरसीपी नेते वायव्ही सुब्बारेड्डी, माजी आमदार पेरणी वेंकटरमैया आणि माजी मंत्री विदादला रजनी यांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारी