ननवरील बलात्कार प्रकरणी मुंबईत एकाला अटक
By Admin | Updated: March 26, 2015 13:07 IST2015-03-26T13:07:38+5:302015-03-26T13:07:45+5:30
पश्चिम बंगालमधील ७१ वर्षीय ननवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी एका आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली आहे.

ननवरील बलात्कार प्रकरणी मुंबईत एकाला अटक
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - पश्चिम बंगालमधील ७१ वर्षीय ननवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी एका आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधिका-यांनी मुंबई पोलिसांच्या सहाकार्याने नागपाडा येथून सलिम शेख या आरोपीस आज अटक केली.
पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात १४ मार्च रोजी वयोवृद्ध ननवर दरोडेखोरांनी सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर त्यांनी कपाटातील १२ लाख रुपये चोरून पोबारा केला होता. या प्रकरणातील माहिती घेऊन पश्चिम बंगाल पोलिस आमच्याकडे आले होते व त्यांनी मदतीची मागणी केली. त्यांना आवश्यक ती मदत देण्यात आल्यावर त्यांनी एका आरोपीला नागापाडा येथून अटक केली. त्या आरोपीला घेऊन अधिकारी रवाना झाले , अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान या पीडित ननला अज्ञात ठिकाणी ठेवण्यात आले आहे.