...तर 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा चालणार नाहीत; RBI ने दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 10:48 AM2021-01-23T10:48:39+5:302021-01-23T10:54:59+5:30

Reserve Bank of India : रिझर्व्ह बँकेकडून 100, 10, 5 रुपयांच्या जुन्या नोटासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

old rs of 100 ten and 5 notes going out of circulation after march | ...तर 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा चालणार नाहीत; RBI ने दिली महत्त्वाची माहिती

...तर 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा चालणार नाहीत; RBI ने दिली महत्त्वाची माहिती

googlenewsNext

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 100, 10 आणि 5 रुपयांच्या नोटांबाबत एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. या निर्णयानंतर जुन्या नोटा या इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेकडून 100, 10, 5 रुपयांच्या जुन्या नोटासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार 100, 10, 5 रुपयांच्या सर्व जुन्या नोटा या मार्च-एप्रिलनंतर चलनात नसणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक बी. महेश यांनी ही माहिती दिली आहे. तसेच या जुन्या नोटा परत मागे घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक बी. महेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरबीआय मार्च-एप्रिलपर्यंत 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाहेर पडतील. कारण या नोटा परत घेण्याची योजना आहे. यांच्या नवीन नोटा आधीपासूनच चलनात आल्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2019 मध्ये 100 रुपयांची नवीन नोट चलनात आणली होती. मात्र नोटाबंदीच्या वेळी 500 आणि 1000 च्या नोटा बंद केल्याने गोंधळ झाला होता. यामुळे आता आरबीआय अचानक कोणतीही जुनी नोट बंद करू इच्छित नाही. तर सर्वप्रथम त्याची नवीन नोट बाजारात चलनामध्ये आणली जाईल. त्यानंतरच जुन्या नोटा चलनातून काढल्या जातील असं आरबीआयने म्हटलं आहे. 

दहा रुपयांच्या नाण्यांविषयी सध्या बाजारात वेगवेगळा अफवा पसरविल्या जात आहेत. काही  व्यापारी किंवा दुकानदार दहाचं नाणं घेण्यास नकार देत आहेत. यावर आरबीआयने ही बँकेसाठी अडचण आहे. म्हणून अशा अफवा टाळण्यासाठी बँक वेळोवेळी सल्ला देते. तरी देखील अनेक लोक चलनामध्ये 10 रुपयांचे नाणे घेण्यास नकार देतात. यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. तरी लोकांनी दहा रुपयांच्या नाण्यांविषयी कोणत्याही अफवांवर लक्ष देऊ नये असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Read in English

Web Title: old rs of 100 ten and 5 notes going out of circulation after march

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.