शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

Electric Scooter Fire : इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये कशी लागली आग?, सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; DRDO ला दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 19:41 IST

Electric Scooter Fire : नुकत्याच इलेक्ट्रीक स्कूटरना आग लागल्याच्या घटना समोर आल्या होत्या. यानंतर आता सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे.

Electric Scooter Fire : पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीनंतर (Petrol Diesel Price Hike) लोकांनी अन्य पर्याय शोधण्यास सुरूवात केली आहे. अनेक जण सध्या इलेक्ट्रीक वाहनांकडे वळताना दिसतायत. सरकारही इलेक्ट्रीक वाहनांच्या खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक हातभार लावत आहे. परंतु Ola Scooter आणि Okinawa Scooter ला लागलेल्या आगीच्या घटनांवरुन सरकारच्या या प्रयत्नांना झटका दिला आहे. सरकारनं याला गंभीरतेनं घेत DRDO ला तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) सेंटर फॉर फायर एक्सप्लोझिव्ह अँड एन्व्हायर्नमेंट सेफ्टी (Centre for Fire Explosive and Environment Safety (CFEES) युनिट पुण्यातील ओला स्कूटर (Ola Scooter) आणि वेल्लोरमधील ओकिनावा स्कूटरला (Okinawa Scooter) आग लागलेल्या घटनांचा तपास करणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं यासंदर्भात एक अधिसूचना काढली आहे. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने CFEES ला या घटनेचं कारण तसंच अशा घटना रोखण्यासाठी अधिक चांगल्या उपाययोजना सुचवण्यासदेखील सांगितलं आहे.

"सरकारनं ओला इलेक्ट्रीक स्कूटर (Ola Electric Scooter) मध्ये लागलेल्या आगीच्या तपासाचे आदेश दिले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ या घटनेचा तपास रून आपला अहवाल मंत्रालयाला सोपवतील," असं यापूर्वी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव गिरिधर अरमाणे यांनी बिझनेस डुटे टीव्हीशी बोलताना सांगितलं होतं. 

आग लागल्यानं खळबळनिळ्या रंगाच्या एका ओला एस १ प्रो इलेक्ट्रिक स्कूटरला पुण्यामध्ये आग लागल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कंपनीने या घटनेची चौकशी सुरू केली आहे. कंपनीने सर्व स्कूटर मागे घ्याव्यात आणि बदलून द्याव्यात, अशी मागणी आता होत आहे.  पुण्यातील या घटनेची आम्हाला माहिती मिळाली. घटनेची चौकशी सुरू केली आहे. कंपनी वाहन सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देते. ही घटना आम्ही गांभीर्याने घेतली आहे. यावर उचित कारवाई करण्यात येईल. याबाबतची अधिक माहिती आगामी काळात जनतेसमोर मांडू, असं कंपनीनं यापूर्वी म्हटलं.

टॅग्स :Olaओलाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरNitin Gadkariनितीन गडकरीDRDOडीआरडीओ