शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Odisha triple train accident : ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना मिळणार 12 लाख, पंतप्रधान आणि रेल्वे मंत्रालयाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 09:18 IST

यासंदर्भात माहिती देताना, अपघातात 237 जणांचा मृत्यू झाला असून 900 जण जखमी झाले असल्याची पुष्टी ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी केली आहे.

ओडिशा रेल्वेअपघातानंतर अद्यापही बचावकार्य सुरू आहे. बचाव आणि मदत कार्यात अनेक जखमींना कटक, भुवनेश्वर आणि बालासोर येथील रुग्णालयात हलविण्यात येत आहे. यासंदर्भात माहिती देताना, अपघातात 237 जणांचा मृत्यू झाला असून 900 जण जखमी झाले असल्याची पुष्टी ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी केली आहे. हा भीषण अपघात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडला. यात मालगाडी, हावडा एक्सप्रेस आणि कोरोमंडल एक्सप्रेस एकमेकांना धडकल्या. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधानांकडून दोन लाख रुपये, तर रेल्वे मंत्रालयाकडून 10 लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना रेल्वे मंत्रालय देणार 10 लाख -ओडिशात झालेल्या या भीषण अपघातात 237 जणांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे मंत्रालयाकडून मृतांच्या नातलगांना नुकसानभरपाईची रक्कम जाहीर करण्यात आली आहे. या अपघातातील मृतांच्या नातलगांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. याचबरोबर या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना दोन लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. यासंदंर्भात बोलताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, "हा अपघात दुर्दैवी असून अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातलगांना प्रत्येकी 10 लाख रुपये, गंभीर जखमींना 2 लाख रुपये, तर किरकोळ जखमी झालेल्यांना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल."

पीएमओनेही जारी केली मदत - पीएम मोदींनी ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांना 2 लाख रुपये, तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. पीएमओने ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. "ओडिशा ट्रेन अपघातात मृत्यू पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नातलगांना पीएमएनआरएफकडून 2 लाख रुपयांची मदत केली जाईल. तसेच जखमींना रुपयांची मप्रत्येकी 50 हजार दत करण्यात येईल," असे या ट्विटमध्ये म्हणण्यात आले आहे.

पंतप्रधान, राष्ट्रपतींना तीव्र दु:खकोरोमंडल एक्स्प्रेस व मालगाडीच्या भीषण अपघातात झालेल्या प्राणहानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश पंतप्रधान मोदी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना दिले आहेत. 

वंदे भारत लोकार्पण रद्द : बालासोर येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेनंतर शुक्रवारी (दि. ३ जून) होणारा मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनचा गोवा राज्यातील मडगाव येथे होणारा लोकार्पण सोहळा रद्द करण्यात आला आहे.

टॅग्स :Odishaओदिशाrailwayरेल्वेAccidentअपघातDeathमृत्यूNarendra Modiनरेंद्र मोदीIndian Railwayभारतीय रेल्वे