Odisha Railway Accident: तीन ट्रेनची टक्कर झाली तेव्हा घटनास्थळी कशी होती परिस्थिती, रेल्वेच्या चार्टमधून समोर आली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 22:06 IST2023-06-03T22:06:35+5:302023-06-03T22:06:35+5:30

Odisha Railway Accident: ओदिशाच्या बालासोरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या अपघाताबाबत नवनवी माहिती समोर येत आहे.

Odisha Railway Accident: What was the situation at the spot when three trains collided, shocking information revealed from the railway chart | Odisha Railway Accident: तीन ट्रेनची टक्कर झाली तेव्हा घटनास्थळी कशी होती परिस्थिती, रेल्वेच्या चार्टमधून समोर आली धक्कादायक माहिती

Odisha Railway Accident: तीन ट्रेनची टक्कर झाली तेव्हा घटनास्थळी कशी होती परिस्थिती, रेल्वेच्या चार्टमधून समोर आली धक्कादायक माहिती

ओदिशाच्या बालासोरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या अपघाताबाबत नवनवी माहिती समोर येत आहे. भारतीय रेल्वेच्या ट्रॅकिंग सिस्टिमने दोन्ही ट्रेनची टक्कर होण्यापूर्वीच्या परिस्थितीबाबत माहिती दिली आहे. या अपघातामध्ये २८० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजारांहून अधिक जण जखमी झाले आहेत. रेल्वेच्या ट्रॅफिक अधिकाऱ्यांकडून इंटरसेक्शनमध्ये यार्ड लेआऊट किंवा डायग्रॅमचा वापर केला जातो. त्यामध्ये अपघातावेळी तिन्ही ट्रेनची पोझिशन काय होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डायग्रॅममधील मधली लाईन अप लाईन आहे. ज्यावर शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस येत होती. जर दुसरी लाईन, ज्याचं नाव डाऊन लाईन आहे. त्यावरून बंगळुरू हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस क्रॉस करताना दिसत होती.

सूत्रांनी सांगितले की, कोरोमंडल एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले. त्यानंतर ते साइड ट्रॅकवर उभ्या मालगाडीवर आदळले. त्याशिवाय काही डबे हे डाऊन मेन लाईनवर कोसळले. त्याशिवाय बंगळुरू-हावडा ट्रेन कोरोमंडल एक्स्प्रेसच्या रुळावरून घसरलेल्या डब्यांवर आदळली.

मात्र अनेक तज्ज्ञ याबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत की, कदाचित कोरोमंडल एक्स्प्रेस ट्रेन ही लूप लाइनवर उभ्या असलेल्या मालगाडीवर आदळली असावी. जे व्हिडीओ समोर येत आहेत त्यामध्ये कोरोमंडल एक्स्पेसचं इंजिन हे मालगाडीवर चढलेले दिसत आहे. त्यामुळे दोन्ही ट्रेनमध्ये थेट टक्कर झालेली असावी, असे वाटते. दरम्यान, सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व बाजूंनी तपास केला जाईल. त्यामध्ये मेकॅनिकल एरर, ह्युमन एरर आणि कट यांचा समावेश आहे.  

Web Title: Odisha Railway Accident: What was the situation at the spot when three trains collided, shocking information revealed from the railway chart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.