शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघात! ओडिशात ट्रेलरच्या धडकेत ५ पोलिसांचा जागीच मृत्यू, ३ जखमी; गाडीचा चक्काचूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 11:08 IST

ओडिशातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भीषण अपघातात ५ पोलीस कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

ओडिशातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भीषण अपघातात ५ पोलीस कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. नॅशनल हायवे ४९ वर झारसुगुडा सदर पोलीस स्टेशनजवळ भरधाव ट्रेलरने पोलिसांच्या गाडीला जोरदार धडक दिली. अपघाताच्या वेळी गाडीत एकूण ८ पोलीस कर्मचारी होते. यापैकी ५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ही धडक इतकी भीषण होती की पोलिसांच्या गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. झारसुगुडाचे पोलीस अधीक्षक (SP) गुंडाला रेड्डी राघवेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व पोलीस कर्मचारी एका विवाह समारंभातून परतत होते. 

जिल्हाधिकारी चव्हाण कुणाल मोतीराम यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत म्हटलं की, "झारसुगुडा येथे आज एक दुर्दैवी घटना घडली असून यात आम्ही ५ पोलीस कर्मचारी गमावले आहेत. हा अपघात नेमका कशामुळे झाला याची चौकशी केली जाईल आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील."

या भीषण अपघातानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे. "झारसुगुडा येथील दुर्दैवी रस्ते अपघातात कर्तव्यावर असलेल्या ५ पोलीस अधिकाऱ्यांच्या अकाली निधनाची बातमी ऐकून मला खूप दुःख झालं आहे. या कठीण काळात शोकग्रस्त कुटुंबांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि अपघातात जखमी झालेले कर्मचारी लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो" असं म्हटलं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tragic accident in Odisha: Trailer collision kills 5 police officers.

Web Summary : Five police officers died and three were injured in Odisha after a trailer truck collided with their vehicle on National Highway 49. The accident occurred near Jharsuguda Sadar police station. They were returning from a wedding ceremony.
टॅग्स :OdishaओदिशाAccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिस