माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 18:28 IST2026-04-12T18:26:38+5:302026-04-12T18:28:00+5:30

Odisha Crime: पतीला कामासाठी घराबाहेर पाठवले अन्...

Odisha Crime: Mother Murdered her two children with an axe, also stabbed herself | माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार

माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार

Odisha Crime: ओडिशा राज्यातील झारसुगुडा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आईने स्वतःच्या दोन लहान मुलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. त्यानंतर या क्रुर महिलेने स्वतःचाही जीव घेण्याचा प्रयत्न केला. सध्या तिची प्रकृती गंभीर आहे.

मध्यरात्रीची भीषण घटना

ही घटना जिल्ह्यातील टंगरपाली गावात घडली. आरोपी महिलेचे नाव रंजिता ओराम झाली आहे. शनिवारी रात्री कुटुंब नेहमीप्रमाणे जेवण करून झोपी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास रंजिताने आपल्या पतीला काही कारण सांगून घराबाहेर पाठवले आणि आतून दरवाजा बंद केला.

कुऱ्हाडीने मुलांवर हल्ला

पती बाहेर गेल्यानंतर रंजिताने आपल्या 10 वर्षीय मुलगी जिज्ञाशा आणि 5 वर्षीय मुलगा विभांशू यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की, दोन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर तिने धारदार शस्त्राने स्वतःचा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला.

खिडकी तोडून पती घरात दाखल

दरम्यान, बाहेर उभ्या असलेल्या पतीला संशय आल्याने त्याने शेजाऱ्यांच्या मदतीने खिडकी तोडून घरात प्रवेश केला. आत पाहताच सर्वजण हादरले. दोन्ही मुले रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडलेली होती, तर रंजिता गंभीर जखमी अवस्थेत आढळली.

रुग्णालयात उपचार सुरू

घटनेनंतर रंजिताला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी वीर सुरेंद्र रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

पोलीस तपास सुरू

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेमागे कौटुंबिक वाद कारणीभूत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title : ओडिशा: मां ने कुल्हाड़ी से दो बच्चों की हत्या की, आत्महत्या का प्रयास

Web Summary : ओडिशा में एक मां ने कुल्हाड़ी से अपने दो बच्चों की हत्या कर दी और खुद को गंभीर रूप से घायल कर लिया। पति ने दरवाजा तोड़कर देखा तो बच्चे मृत थे और मां घायल थी। पुलिस को पारिवारिक विवाद का संदेह है।

Web Title : Odisha: Mother Murders Two Children with Axe, Attempts Suicide

Web Summary : In Odisha, a mother killed her two children with an axe and critically injured herself. The husband found the children dead and the mother injured after breaking into the locked house. Police suspect a family dispute as the motive.