शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
4
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
5
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
6
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
7
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
8
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
9
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
10
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
11
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
12
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
13
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
14
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
15
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
16
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
17
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
18
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
19
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
20
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड

पदक हुकलं पण मन जिंकलं! भारताच्या भालाफेकपटूवर पैशांचा पाऊस; CM पटनायकांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 4:00 PM

world championships 2023 javelin : जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या किशोर जेनानं अंतिम फेरीत स्थान मिळवलं. 

kishore jena javelin throw : जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिरंग्याची शान वाढवणारा भालाफेकपटू किशोर जेना याला पदक जिंकण्यात अपयश आलं पण त्यानं तमाम भारतीयांच्या मनात जागा केली. या स्पर्धेत किशोरला एकही पदक जिंकता आलं नाही, पण त्यानं पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवलं. खरं तर भारताचे तीन खेळाडू पहिल्या सहामध्ये होते. नीरज चोप्रानेसुवर्ण पदक जिंकले, तर किशोरला पाचव्या आणि डीपी मनूला सहाव्या स्थानावर समाधान मानाव लागलं. पहिल्या पाचपर्यंत मजल मारण्यात यश मिळवणाऱ्या किशोर जेनाला ओडिशा सरकारनं बक्षीस जाहीर केलं आहे. 

 CM पटनायक यांची घोषणाकिशोर जेनानं केलेल्या कामगिरीमुळं ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी त्याला २५ लाखांचे रोख बक्षीस जाहीर केलं. जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताचं प्रतिनिधित्व करणारा किशोर हा ओडिशाचा पहिला खेळाडू ठरला आहे. रविवारी त्यानं जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ८४.७७ मीटर भाला फेकला होता. भालाफेकमधील ही त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ठरली. 

भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं पुन्हा एकदा सोनेरी कामगिरी करत इतिहास रचला. ऑलिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा आणि डायमंड लीग चॅम्पियन असलेल्या नीरजने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये देखील सुवर्ण पदक जिंकले. लक्षणीय बाब म्हणजे या स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय ठरला आहे. नीरजनं तब्बल ८८.१७ मीटर भाला फेकून सोन्यावर शिक्कामोर्तब केला. त्यामुळं भारताच्या या शिलेदाराला २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पदकाचा प्रबळ दावेदार मानलं जात आहे. 

दरम्यान, जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ च्या भालाफेक स्पर्धेत १२ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज अव्वल राहिला. त्यानं ८८.१७ मीटर भाला फेकून सुवर्ण पदकाला गवसणी घातली. पाकिस्तानचा अर्शद नदीम दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याला ८७.८२ मीटर अंतरापर्यंत भाला फेकण्यात यश आलं. त्यामुळं पाकिस्तानच्या अर्शदला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. 

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राAssamआसामChief Ministerमुख्यमंत्रीGold medalसुवर्ण पदक