अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 09:14 IST2025-09-16T09:13:12+5:302025-09-16T09:14:06+5:30
भाजपा जिल्हाध्यक्ष कन्हैया पासवान यांनी केलेल्या तक्रारीनंतर गौरीशंकर यांना पक्षातून काढण्यात आले. गौरीशंकर यांच्या व्हिडिओमुळे विरोधकांनी भाजपाला टार्गेट केले आहे.

अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
लखनौ - उत्तर प्रदेशातील एका भाजपा नेत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत भाजपाचे सिद्धार्थनगर येथील जिल्हा उपाध्यक्ष गोरिशंकर अग्रहरी एका अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करताना दिसतात. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून भाजपावर टीका होऊ लागली. त्यात पक्षाने तातडीने दखल घेत गोरीशंकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. हा व्हिडिओ १ आठवडा जुना असल्याचं बोलले जाते. त्यात भाजपा नेत्याकडून केले जाणारे अश्लील कृत्य एका अल्पवयीन मुलीसोबत आहे त्यामुळे हे प्रकरण गंभीर मानले जाते. या प्रकरणी पोलिसांनीही कारवाई सुरू केली आहे.
जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा माध्यमांनी संबंधित नेत्याची प्रतिक्रिया विचारली. तेव्हा ते म्हणाले की, मी भाजपाच्या कुठल्याही पदावर नाही. हे सर्व चालत राहते. मला बदनाम करण्यासाठी असं केले गेले. राजकारणात माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी हा व्हिडिओ पसरवला जात आहे. तो एडिट केलेला आहे. शरीर वेगळे आणि चेहरा माझा लावला आहे. ज्याने हे केले आहे त्याला मी ओळखतो. राजकारणासाठी इतक्या खालच्या पातळीला ते उतरतील असं वाटलं नव्हते. हा व्हिडिओ माझा नाही असा दावा गौरीशंकर अग्रहरी यांनी केला होता.
३० वर्ष भाजपात कार्यरत
गौरीशंकर अग्रहरी जवळपास ३० वर्ष भाजपात आहेत. २०२० साली पक्षाकडून त्यांना जिल्हा उपाध्यक्षपदी नेमणूक केली होती. २०२३ च्या बांसी नगरपालिका निवडणुकीत त्यांनी उमेदवारी मागितली होती परंतु पक्षाने तिकिट दिले नाही. मात्र आता त्यांचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष कन्हैया पासवान यांनी केलेल्या तक्रारीनंतर गौरीशंकर यांना पक्षातून काढण्यात आले. गौरीशंकर यांच्या व्हिडिओमुळे विरोधकांनी भाजपाला टार्गेट केले आहे.
प्रदेश महामंत्री गोविंद नारायण शुक्ल यांनी पत्रक काढत गौरीशंकर अग्रहरी यांना पक्षातून बेदखल केले आहे. या पत्रकात त्यांचे पद आणि नाव दोन्ही लिहिले आहे. भाजपात कुठल्याही प्रकारे चुकीची वर्तवणूक खपवून घेतली जाणार नाही. पक्षाची प्रतिमा मलिन करणाऱ्या कुठल्याही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं गोविंद नारायण यांनी म्हटलं.