शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

छा गये ओबामा!

By admin | Updated: January 28, 2015 05:30 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी तीन दिवसांच्या दौऱ्याची सांगता करून भारतवासीयांचा निरोप घेण्यापूर्वी आर्थिक सहकार्याची आणि मित्रत्वाची हमी

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी तीन दिवसांच्या दौऱ्याची सांगता करून भारतवासीयांचा निरोप घेण्यापूर्वी आर्थिक सहकार्याची आणि मित्रत्वाची हमी देतानाच विकासाच्या मार्गावर मार्गक्रमण करीत राहण्यासाठी धार्मिक एकोपा कायम ठेवा, असा सल्ला भारतीयांना दिला़ मंगळवारी दक्षिण दिल्लीच्या सिरीफोर्ट आॅडिटोरियममध्ये ओबामांनी देशातील निवडक मान्यवर आणि विद्यार्थ्यांना संबोधित केले़ आपल्या ३० मिनिटांच्या उत्स्फूर्त भाषणात बराक ओबामांनी उपस्थितांचीच नव्हे, तर संपूर्ण देशवासीयांची मने जिंकली़ अमेरिकेतील शिकागो येथे धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी ‘ब्रदर्स अ‍ॅण्ड सिस्टर्स आॅफ अमेरिका’ने भाषणाची सुरुवात केली होती़ या ऐतिहासिक घटनेचा उल्लेख करीत ‘ब्रदर्स अ‍ॅण्ड सिस्टर्स आॅफ इंडिया’ असे ओबामांनी म्हणताच संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला़ या भाषणात ओबामांनी धार्मिक स्वातंत्र्यासोबतच मानवाधिकार, स्वातंत्र्य, महिला सुरक्षा आणि भारत-अमेरिका संबंध अशा अनेक मुद्द्यांना हात घातला़ सर्व धर्म एकाच झाडाची फुले आहेत, या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वचनाचे स्मरण ओबामांनी केले़ येथे विविध जातीपंथांचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत आणि धार्मिक एकोपा कायम आहे, तोपर्यंत भारताचा विकास कुणीही रोखू शकत नाही, असे ओबामा म्हणाले़ > भारतीय सशस्त्र दलात महिलांचा सहभाग ही अविश्वसनीय बाब असून, माझ्या मनाला भावलेली एक चांगली बाब आहे. एखाद्या देशातील महिला प्रगती करतात, तेव्हाच तो देश यशस्वी होतो. - बराक ओबामा> गरिबी, तरुणाई आणि स्वप्नेगरिबांनाही स्वप्ने बघण्याचा अधिकार आहे, असे सांगत ओबामांनी आपल्या भाषणात व्यक्तिस्वातंत्र्याच्या मुद्द्याला हात घातला़ या वेळी आपल्या आयुष्यातील काही घटनांचा उल्लेखही त्यांनी केला़ ते म्हणाले, मी आणि मिशेल अतिशय गरीब कुटुंबातून आलेलो आहोत़ शिष्यवृत्ती आणि शिक्षकांनी केलेले संस्कार या आधारावर आम्ही आज येथे आहोत़ माझ्या आयुष्यातही अनेक प्रसंग आलेत़ कातडीच्या रंगामुळे मला अनेकदा भेदभावाचे चटके सहन करावे लागले़ माझ्या आस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले़ भारतात एक चहा विकणारा पंतप्रधान झाला़ एका आचाऱ्याचा नातू राष्ट्रपती बनला़ अशा देशात तुम्ही राहता़ भारतात तरुणांची संख्या अधिक आहे आणि भारताचे तरुण देशाचे भविष्य घडवू शकतात़