बचत गटांच्या पोषण आहारांचा निधी ४ दिवसांमध्ये मिळणार

By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:03+5:302015-03-20T22:40:03+5:30

पुणे : महापालिकेच्या शाळांना पोषण आहाराचा पुरवठा करणार्‍या बचत गटांचे थकीत ६ कोटी रूपये जिल्हा परिषदेकडून येत्या ४ दिवसांमध्ये मिळणार आहेत, त्यानंतर त्यांना त्याचे वाटप केले जाईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी मुख्य सभेत दिली. गेल्या अनेक दिवसांपासून बचत गटाच्या महिलांचे पैसे थकल्याने त्यांना मोठया अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Nutrition fund for savings groups will be funded within 4 days | बचत गटांच्या पोषण आहारांचा निधी ४ दिवसांमध्ये मिळणार

बचत गटांच्या पोषण आहारांचा निधी ४ दिवसांमध्ये मिळणार

णे : महापालिकेच्या शाळांना पोषण आहाराचा पुरवठा करणार्‍या बचत गटांचे थकीत ६ कोटी रूपये जिल्हा परिषदेकडून येत्या ४ दिवसांमध्ये मिळणार आहेत, त्यानंतर त्यांना त्याचे वाटप केले जाईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी मुख्य सभेत दिली. गेल्या अनेक दिवसांपासून बचत गटाच्या महिलांचे पैसे थकल्याने त्यांना मोठया अडचणींचा सामना करावा लागत आहे.
महापालिकेच्या शाळामधील १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला होता. महिला बचत गटामार्फत विद्यार्थ्यांना हे पोषण आहार दिले जात आहेत. मुख्य सभेच्या सुरूवातीला महिला बचत गटांना पोषण आहाराचे पैसे अनेक दिवसांपासून मिळाले नसल्याचा मुदद शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ यांनी उपस्थित केला. अनेक बचत गटांची लाखोमध्ये थकित रकमेची यादीच त्यांनी वाचून दाखविली. पैसे मिळत नसल्याने अनेक महिलांनी घरातील सोने विकून विद्यार्थ्यांना पोषण आहार दिल्याचे हरणावळ यांनी स्पष्ट केले.
बचत गटांच्या महिलांचे पैसे महापालिका प्रशासन देत नसल्याने त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देता येत नसल्याचे सोनम झेंडे यांनी सांगितले. बचत गटाकडून देण्यात येत असलेल्या पोषण आहाराच्या दर्जाची तपासणी व्हावी अशी मागणी दीपक मानकर यांनी केली.
याला उत्तर देताना राजेंद्र जगताप यांनी स्पष्ट केले की, 'पोषणआहाराची रक्कम शासनाकडून जिल्हा परिषदेमार्फत दिली जाते. त्यांच्याकडून आतापर्यंत १ कोटी ६७ लाख रूपयांचे अनुदान मिळालेले आहे, मात्र आणखी ६ कोटी रूपये येणे बाकी आहे. शासनाकडून थकित रक्कम मिळाल्याशिवाय बचत गटांना पोषण आहाराचे पैसे देता येणार नाहीत. येत्या ४ दिवसांमध्ये जिल्हा परिषदेकडून थकित रक्कम महापालिकेकडे जमा होणार आहे. त्यानंतर लगेच बचत गटांची बिले अदा केली जातील. पोषण आहाराचा दर्जा तपासण्यासाठी वॉर्डस्तरीय समिती नेमण्यात आली आहे.'

Web Title: Nutrition fund for savings groups will be funded within 4 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.