nusrat jahan spoke again on love jihad where do not make religion a tool of politics | "धर्माला राजकारणाचे साधन बनवू नका", 'लव्ह-जिहाद'वरून खासदार नुसरत जहाँ भाजपावर बरसल्या

"धर्माला राजकारणाचे साधन बनवू नका", 'लव्ह-जिहाद'वरून खासदार नुसरत जहाँ भाजपावर बरसल्या

ठळक मुद्देलव्ह-जिहादवर कायदा आणण्याच्या मुद्द्यावरून नुसरत जहाँ यांनी भाजपा विष असल्याचे म्हटले आहे.

कोलकाता : देशात आधीपासूनच लव्ह-जिहादवर वाद सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये याविरोधात कायदा आणण्याविषयी बोलले जात आहेत. दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे खासदार नुसरत जहाँ यांनी लव्ह जिहादवर मोठे विधान केले आहे. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत नुसरत जहाँ यांनी राजकीय पक्षांवर निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे, पश्चिम बंगालच्या 294 सदस्यीय विधानसभेसाठी पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात निवडणुका होणार आहेत.

प्रेम ही एक अतिशय वैयक्तिक गोष्ट आहे. प्रेम आणि जिहाद एकत्र जाऊ शकत नाहीत, असे सोमवारी पत्रकार परिषदेत खासदार नुसरत जहाँ  यांनी सांगतिले. तसेच, निवडणुकीपूर्वी लोक असे विषय घेऊन येत आहेत. तुम्हाला कोणासोबत साहायते आहे, हा वैयक्तिक निर्णय आहे. एकमेकांवर प्रेम करा, असे सांगत नुसरत जहाँ यांनी लव्ह-जिहादविरोधात विधान करणार्‍या पक्षांविरोधात नाराजी व्यक्त केली आणि धर्माला राजकारणाचे साधन बनवू नका, असे सांगितले.

भाजपा विष असल्याचे सांगत साधला निशाणा
शनिवारी खासदार नुसरत जहाँ यांनी ट्विटद्वारे भाजपावर निशाना साधला होता. त्या म्हणाल्या, "बंगालमध्ये आम्ही धर्मनिरपेक्ष प्रेमावर विश्वास ठेवतो आणि यात काहीही चूक नाही. प्रेम वैयक्तिक आहे आणि भाजपाने प्रेम करायला शिकले पाहिजे." याशिवाय, लव्ह-जिहादवर कायदा आणण्याच्या मुद्द्यावरून नुसरत जहाँ यांनी भाजपा विष असल्याचे म्हटले आहे.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचेही भाजपाला सवाल
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही लव्ह जिहादवरून भाजपासमोर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत."ज्या भाजपा नेत्यांनी दुसऱ्या धर्मात लग्न केले आहे, त्यांच्यावरही लव्ह-जिहाद कायदा लागू होणार का? अनेक भाजपा नेत्यांच्या कुटुंबीयांनी इतर धर्मांमध्ये विवाह केला आहे. मला भाजपा नेत्यांना विचारायचे आहे की, हे विवाह सुद्धा लव्ह जिहादच्या परिभाषेत मोडतात का?" असे सवाल भूपेश बघेल यांनी केले आहेत.

दरम्यान, भाजपाने लव्ह-जिहादचा मुद्दा उचलून धरलेला आहे. देशभरातील भाजपाशासित राज्यांमध्ये लव्ह-जिहाद विरोधात कठोर कायदा आणण्याची तयारी सुरू आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: nusrat jahan spoke again on love jihad where do not make religion a tool of politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.