शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

नुपूर शर्मांच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला, पाकिस्तानी घुसखोराला अटक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 19:59 IST

Nupur Sharma : राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे भारत-पाक सीमेवर एका घुसखोराला अटक केली असून त्याने नुपूर शर्मा यांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी केला आहे.

नवी दिल्ली : भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या कथित वक्तव्यावरून सुरु झालेला वाद थांबत नाही आहे. आता याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे भारत-पाक सीमेवर एका घुसखोराला अटक केली असून त्याने नुपूर शर्मा यांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी केला आहे.

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांची हत्या करण्यासाठी पाकिस्तानातील हा घुसखोर भारतात पोहोचला होता. अशरफ रिझवान असे या घुसखोरी करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. ही व्यक्ती हिंदुमलकोट सेक्टरमध्ये असलेल्या खाखान चेकपोस्टवरून देशाच्या सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली होती. पाकिस्तानच्या पंजाबमधील मंडी बहाउद्दीन येथील रहिवासी असलेल्या अशरफबाबत आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

अशरफचा भारतात येण्यामागचा हेतू अत्यंत घातक होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीएसएफच्या चौकशीत उघड झाले आहे की, या घुसखोराला भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्माची हत्या करायची होती. नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे अशरफ दुखावला होता. भारतात प्रवेश केल्यानंतर अशरफला श्रीगंगानगरहून अजमेर दर्ग्याला जायचे होते. येथे चादर चढवून त्याने नुपूर शर्मा यांना मारण्याचा कट रचला होता, अशी शक्यता वर्तवली जात आहे. इयत्ता आठवीपर्यंत शिकलेल्या अशरफला उर्दू, पंजाबी आणि हिंदी भाषा समजते.

पाकिस्तानमध्ये मौलवींची बैठक!नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तानमध्ये मौलवींची बैठक झाल्याचे बोलले जात आहे. या बैठकीत अशरफ रिझवानचाही सहभाग होता. या बैठकीनंतरच त्याने नुपूर शर्मा यांना मारण्याचा निर्णय घेतला होता. अशरफ रिझवानकडून काही धार्मिक पुस्तके आणि दोन चाकूही जप्त करण्यात आले आहेत. तसेच, अशरफ रिझवानच्या चौकशीत इतरही अनेक मोठे खुलासे होऊ शकतात.

नुपूर शर्मा यांना मोठा दिलासानुपूर शर्मा यांना बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. दरम्यान, मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाकडूनही त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पैगंबरांबद्दल वक्तव्ये करून वादात सापडलेल्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात देशातील अनेक भागात एफआयआर दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी न्यायालयाने त्यांच्या अटकेला तूर्तास स्थगिती दिली आहे.

नुपूर शर्मा यांनी आपल्या याचिकेत देशभरात दाखल झालेले विविध गुन्हे दिल्ली उच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याची मागणी केली होती आणि अटकेला स्थगिती देण्याचीही मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 ऑगस्ट रोजी होणार आहे. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीपर्यंत नुपूर शर्मांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीBJPभाजपा