Nupur Sharma Controversy: नुपूर शर्मा प्रकरण; 15 निवृत्त न्यायाधीशांसह 117 उच्च अधिकाऱ्यांचे सरन्यायाधीशांना पत्र, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 03:49 PM2022-07-05T15:49:39+5:302022-07-05T15:50:22+5:30

Nupur Sharma Controversy: भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीचा निषेध करत देशातील माजी न्यायाधीश आणि अधिकाऱ्यांनी सरन्यायाधीश एनव्ही रमना यांना खुले पत्र लिहिले आहे.

Nupur Sharma Controversy: An open letter sent to CJI NV Ramana, against the observation made by Justices Surya Kant & JB Pardiwala गल Nupur Sharma's case | Nupur Sharma Controversy: नुपूर शर्मा प्रकरण; 15 निवृत्त न्यायाधीशांसह 117 उच्च अधिकाऱ्यांचे सरन्यायाधीशांना पत्र, म्हणाले...

Nupur Sharma Controversy: नुपूर शर्मा प्रकरण; 15 निवृत्त न्यायाधीशांसह 117 उच्च अधिकाऱ्यांचे सरन्यायाधीशांना पत्र, म्हणाले...

Next

Nupur Sharma Case: भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)  सुनावणी झाली. आता या सुनावणीचा निषेध करत देशातील 15 माजी न्यायाधीश आणि अधिकाऱ्यांनी(bureaucrats) मंगळवारी सरन्यायाधीश एनव्ही रमना (NV Ramana) यांना खुले पत्र (Open Letter)  लिहिले आहे. पत्रात त्यांनी कोर्टाने 'लक्ष्मण रेषा' ओलांडल्याचा उल्लेख केला. तसेच, कोर्टात झालेल्या सुनावणीत तातडीने सुधारणा करण्याची मागणीही केली आहे.

सरन्यायाधीशांना पाठवलेल्या या पत्रात म्हटले की, न्यायमूर्ती सूर्यकांत निवृत्त होईपर्यंत त्यांचे रोस्टर मागे घेण्यात यावे. यासोबतच नुपूर शर्मा प्रकरणातील सुनावणीदरम्यान त्यांनी दिलेली टिप्पणी आणि आदेश मागे घेण्याच्या सूचना देण्यात याव्यात, अशीही मागणी पत्रातून करण्यात आली आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जेबी पार्डीवाला यांनी नुपूर शर्मा प्रकरणात वक्तव्य केले होते.

1 जुलै रोजी झाली होती सुनावणी
1 जुलै रोजी नुपूर शर्माने पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, शर्माच्या या कृत्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. त्यांनी देशाला संकटात टाकले. याशिवाय देशात जे काही घडत आहे त्याला नुपूर शर्माच जबाबदार आहेत. 

यांनी पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या
नुपूर शर्मा प्रकरणाबाबत सरन्यायाधीश एनव्ही रमना यांना खुले पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रावर 15 निवृत्त न्यायाधीश, 77 निवृत्त नोकरशहा आणि 25 निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. हे पत्र सर्वोच्च न्यायालयात नुपूर शर्मा प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जेबी पार्डीवाला यांच्याविरोधात सरन्यायाधीश रमना यांना पाठवण्यात आले आहे.
 

Web Title: Nupur Sharma Controversy: An open letter sent to CJI NV Ramana, against the observation made by Justices Surya Kant & JB Pardiwala गल Nupur Sharma's case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.